यंदाही दहावीसाठी तीन परीक्षा
बेंगळूर : यंदा देखील दहावी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी तीन परीक्षा असतील,असे स्पष्टीकरण शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने दिले आहे. काही दिवसांपूर्वीच दहावी परीक्षा-1 व 2 चे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. यामुळे परीक्षा 3 बाबत विद्यार्थ्यांमध्ये गेंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे परीक्षा मंडळाने 2025-26 या शैक्षणिक वर्षातही दहावीसाठी तीन परीक्षा घेतल्या जातील. पहिल्या दोन परीक्षांच्या निकालाच्या अवधीच्या आधारावर परीक्षा 3 चे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल. मागील दोन वर्षांपासू दहावी आणि बारावीसाठी तीन टप्प्यात परीक्षा घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी भीतीशिवाय परीक्षेला सामोरे जावे व पदवीपूर्व शिक्षणातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने ही परीक्षा पद्धत लागू करण्यात आली आहे. त्यामुळे निकालातही काही प्रमाणात सुधारणा दिसून आली आहे.