महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

यंदा इफ्फी असेल अतिभव्य!

06:56 AM Nov 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

’कॅचिंग डस्ट’ चित्रपटाने उद्या उघडणार पडदा : नवीन तंत्रज्ञान, सुविधांची भर

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

देशविदेशातील शेकडो चित्रपट सिताऱ्यांसह विविध वैशिष्ट्यांनी भरलेला यंदाचा इफ्फी अतिभव्य, न भूतो...! असाच असणार आहे. उद्या सोमवार दि. 20 नोव्हेंबर रोजी इफ्फीचा पडदा उघडणार असून सिनेजगतासह राजकीय क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत नेत्रदीपक उद्घाटन सोहळा होणार आहे. या महासोहळ्याचा जगभरातील रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेतून करण्यात आले.

गोवा करमणूक संस्थेच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो यांच्या उपस्थितीत या पत्रकार परिषदेस एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रिथूल कुमार, सीईओ अंकिता मिश्रा, पीआयबीच्या महासंचालक मनोदिपा मुखर्जी आणि डॉ. प्रग्या पालिवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

गत सुमारे 20 वर्षांपासून गोव्यात आयोजित होणाऱ्या या महोत्सवात दरवर्षी नवनवीन वैशिष्ट्यांची भर पडत असून तो अधिकाधिक प्रगल्भ आणि परिपक्व होत आहे. यंदाही तेच चित्र दिसणार असून थेट महोत्सवाच्या लोगोपासूनच सर्व काही अतिभव्य, नेत्रदीपक आणि मनभावक असणार आहे. त्यामुळेच दरवर्षी महोत्सवास प्रतिनिधींचा वाढता प्रतिसादही मिळत असून यंदा आतापर्यंतच सुमारे 6500 प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. नोंदणीची ही प्रक्रिया शेवटच्या दिवशी म्हणजेच 28 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

एवढेच नव्हे तर यंदा साधनसुविधांतही मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या असून त्यामुळे महोत्सवास दर्जेदारपणा येणार आहे. प्रोजक्टर्स, मोबाईल अॅप  अधिक अत्याधुनिक करण्यात आले आहेत. सर्व प्रतिनिधींना मोफत व्हायफाय सुविधा, इफ्फी स्थळांपर्यंत कदंब बसेस आणि रिक्षातर्फे मोफत प्रवास सेवा, दिव्यांग प्रतिनिधींसाठी व्हील चेअरयुक्त रिक्षा, सर्वसामान्य नागरिकांसाठी मिरामार समुद्रकिनारा, हणजुणे जीटीडीसी पार्किंग आणि रविंद्र भवन मडगाव आदी  ठिकाणी निवडक चित्रपट दाखविणे, पणजीत नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या ‘योग सेतू’ वॉकवे भागात चित्रपट क्षेत्राचा इतिहास कथन करणारे प्रदर्शन, आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्याशिवाय स्थानिक स्वयंसेवा गटांचे स्टॉल्स असतील अशी माहिती देण्यात आली.

मुख्य केंद्र असलेल्या आयनॉक्स थिएटरसह शहरातील सम्राट थिएटर, कला अकादमी, मेरियॉट हॉटेल, आयनॉक्स पर्वरी आदी ठिकाणी महोत्सवाचे कार्यक्रम होणार आहेत. उद्घाटन आणि समोराप सोहळा बांबोळी येथील श्यामाप्रसाद स्टेडियमवर होणार आहे. त्यावेळी सिनेतारकांची मांदियाळी पाहता येणार आहे. इफ्फी हा केवळ प्रतिनिधींसाठी नसून स्थानिकांसह पर्यटक आणि सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा लाभ घेता यावा या हेतूने हा ‘सिने मेळा’ सर्वसमावेशक करण्याचे प्रयत्न झाल्याचे अंकिता मिश्रा यांनी सांगितले.

महोत्सवाच्या दरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्थेवर कोणताही ताण येऊ नये या उद्देशाने विविध ठिकाणी व्हीआयपी आणि अन्य स्तरावरील प्रतिनिधींसाठी अतिरिक्त पार्किंगची सुविधा निर्माण करण्यात आली असून त्याकामी स्थानिक पोलीस पूर्ण सहकार्य करणार आहेत. त्यांना लोकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

या चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. तिला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, यंदा प्रथमच स्थानिक कोकणी भाषेतून वार्तापत्रे जारी करण्यात येणार आहेत. दि. 22 रोजी मिरामार येथे मेरियाट हॉटेलमध्ये आयोजित करण्यात येणारा ‘फिल्म बझार’ पत्रकारांसाठी अधिक आकर्षक व अनुभवसंपन्न वाटावा या उद्देशाने दुपारी 3 वाजता खास प्रवास सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी प्रत्येकाने पूर्व नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. रेड कार्पेटची फोटोग्राफी, चित्रिकरण करण्यासाठी आयनॉक्समध्ये विशेष मंचाची व्यवस्था करण्यात येणार आहे. श्यामाप्रसाद स्टेडियमवर स्पर्धात्मक चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. त्यासाठी केवळ पासधारकांनाच प्रवेश देण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. तत्पूर्वी  एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रिथूल कुमार यांनी इफ्फीचा इतिहास आणि 54 व्या महोत्सवातील संपूर्ण कार्यक्रमांचा आढावा घेतला. डॉ. पालिवाल यांनी स्वागत केले.

महोत्सवातील चित्रपटांच्या संख्येत तिप्पट वाढ

यंदाचा हा 54 वा महोत्सव असून त्यात 105 देशांमधील मिळून एकूण 2962 चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. ही संख्या गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट आहे. महोत्सवात 13 चित्रपटांचे जागतिक प्रीमियर, 18 आंतरराष्ट्रीय प्रीमियर, 62 आशिया प्रीमियर, 89 भारतीय प्रीमियर यांचा समावेश असेल. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील 15 चित्रपट, पहिल्यांदाच दिग्दर्शन केलेल्यांचे 7 चित्रपट, 198 आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि महिला दिग्दर्शकांचे 40 आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. त्याशिवाय नव्या स्वऊपात फेरनिर्माण करण्यात आलेले अनेक अत्यंत जुने चित्रपट प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.

‘कॅचिंग डस्ट’ या ब्रिटीश चित्रपटाने इफ्फीचा पडदा उघडेल तर ‘द फिदरव्हेट’ या अमेरिकन चित्रपटाने महोत्सवाची सांगता होईल.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article