लाखो रुपयांमध्ये विकले जाते हे कलिंगड
दुर्लभ फळाचा होतो लिलाव
जगभरात अनेक फळं मिळतात, या फळांच्या किमतीही वेगवेगळ्या असतात. भारतात सर्वसाधारणपणे फळांच्या किमती 500 रुपयांपर्यत असतात. उन्हाळ्यात कलिंगड आणि टरबूज यासारख्या फळांची मागणी अधिक असते. भारतात कलिंगडची किंमत फार तर 100 रुपये किंवा 200 रुपये प्रतिकिलोपर्यंत असते. परंतु एक असे कलिंगड आहे, ज्याची किंमत लाखो रुपयांमध्ये असते.
सर्वसाधारण व्यक्ती हे कलिंगड खरेदी करण्याचा विचारही करू शकत नाही. मागणीनुसार कलिंगडाच्या किमती कमी आणि वाढत असतात. परंतु या कलिंगडाचा लिलाव होत असतो. या खास प्रकारच्या कलिंगडला प्रत्येक जण खरेदी करू शकत नाही.
जपानमध्ये हे दुर्लभ कलिंगडाचे पिक घेतले जाते. याचमुळे जगातील सर्वात महाग कलिंगड म्हणून याला ओळखले जाते. हे कलिंगड डेनसुक प्रजातीचे असून त्याला काळे कलिंगड देखील म्हटले जाते. जपानच्या होकाइडो आयलँडच्या उत्तर भागातच याचे पिक घेतले जाते. या दुर्लभ प्रजातीच्या कलिंगडाचे पीक खूपच कमी असते. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजेच डेनसुक प्रजातीचे कलिंगड एका वर्षात केवळ 100 नगच तयार होत असतात. यामुळे फळांच्या बाजारात हे मिळणे अत्यंत अवघड असते.
डेनसुक प्रजातीचे कलिंगड अत्यंत खास असल्याने दरवर्षी त्यांचा लिलाव केला जातो आणि हे दुकानांवर विकले जात नाही. या कलिंगडाकरता मोठमोठ्या बोली लागतात आणि त्यांची किंमत लाखो रुपयांमध्ये असते. या प्रजातीच्या कलिंगडाला मागील लिलावात 4.5 लाख रुपयांची किंमत मिळाली होती.
हे काळे कलिंगड जगातील सर्वात महाग आणि दुर्लभ कलिंगड आहे. हे स्वत:च्या वैशिष्ट्यांमुळे अत्यंत दुर्लभ आहे. हे कलिंगड बाहेरून चमकणारे आणि काळे दिसते. याच्या आत लाल रंगाचा हिस्सा असतो. हे अन्य कलिंगडच्या तुलनेत अधिक गोड असते, तर यात बियांचे प्रमाणही कमी असते. या दुर्लभ प्रजातीच्या कलिंगडचे पहिले पिकच महाग असते. यानंतरचे कलिंगड 19 हजार रुपयांपर्यंत विकले जाते.