कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वास्तुकलेचा चमत्कार आहे हा टॉवर

07:00 AM Jan 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आत दिसतात पुस्तकांची लांब भुयारं

Advertisement

Advertisement

प्रागच्या म्युनिसिपल लायब्रेरीच्या लॉबीत एक अद्भूत टॉवर असून याला इडिओम म्हटले जाते. तसेच द टॉवर ऑफ नॉलेज किंवा द इन्फिनिटी बुक टॉवर या नावानेही ओळखले जाते. काही लोक याला वास्तकुलेचा चमत्कार संबोधितात कारण यात डोकावल्यास लोकांना पुस्तकांच्या ‘अनंत’पर्यंत लांब भुयार दिसून येते. या टॉवरमध्ये डोकावताच तुम्ही दंग होऊन जाता. परंतु हा केवळ डोळ्यांचा भ्रम असतो, आता याच टॉवरशी निगडित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या टॉवरमध्ये पाहिल्यास जणू पुस्तकांचे भुयार अनंतापर्यंत जात असल्याचे वाटू लागते. हा व्हिडिओ अत्यंत अद्भूत आहे, यात तुम्ही हा टॉवर पाहून चकित व्हाल. या टॉवरच्या व्हिडिओला आतापर्यंत 44 हजारांहून अधिक लाइक्स प्राप्त झाल्या आहेत. इडिओम प्रत्यक्षात एक बुक टॉवर आर्ट इन्स्टॉलेशन आहे, ज्याची निर्मिती स्लोवाक आर्टिस्ट मेटेज क्रॅन यांच्याकडून करण्यात आली आहे, या टॉवरचा विशाल आकार आणि डिझाइनसाठी लोक त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक करतात. द इन्फिनिटी बुक टॉवर निर्माण करण्यासाठी सुमारे 8 हजार पुस्तकांचा वापर करण्यात आला आहे. ही सर्व पुस्तके दान करण्यात आली आहेत किंवा ती फेकण्यापासून वाचविण्यात आली आहेत. एक टॉवर निर्माण करण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे परस्परांच्या जवळ ठेवण्यात आले आहे.या टॉवरमध्ये डोकावून पाहण्यासाठी रिकामी जागा ठेवण्यात आली आहे. ही डोळ्यातील अश्रूप्रमाणे दिसून येते. याच्या टॉप आणि बॉटमवर आरसे ठेवण्यात आले असून ते ‘अनंत प्रभाव’ निर्माण करतात. याचमुळे यात डोकावुन पाहताच लोकांना पुस्तकांची एक अंतहीन भुयार दिसते. मोठ्या संख्येत लोक हा अनोखा टॉवर पाहण्यासाठी येत असतात.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article