यंदाच्या हंगामात दिसणार जिल्हयाबाहेरील 44 खेळाडूंचा जलवा
कोल्हापूर :
येत्या काहीच दिवसात कोणत्याही क्षणी कोल्हापूरी फुटबॉल हंगामाचा किकऑफ होईल, अशी चिन्हे तयार झाली आहे. केएसएकडून स्पर्धांसाठी छत्रपती शाहू स्टेडियम सर्व बाजूंनी सुसज्ज करण्याचे सुऊ असलेले काम अंतिम टप्प्यात आहे. दुसरीकडे स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व करणाऱ्या सोळाही वरिष्ठ संघांनी दर्जेदार खेळाडूंना आपल्याकडे खेचत भक्कम संघ बांधणी केली आहे. यामध्ये केएसएच्या नियमानुसार सोळाही संघांमधून कोल्हापूर जिह्याबाहेरील प्रत्येकी 3 राज्य व राष्ट्रीय खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिले आहे. त्यामुळे आता सहाजिकच जिह्याबाहेरील नव्या 35 व गतफुटबॉल हंगामात खेळलेल्या 9 अशा एकूण 44 खेळाडूंचा जलवा फुटबॉलप्रेमींना पहायला मिळणार आहे. असे असले तरी बाहेरील आणि स्थानिक खेळाडूंचे टिम कॉम्बिनेशन कितपत चांगले होईल, त्यावरच स्पर्धांमधील संघांच्या अस्तित्व दिसून येणार आहे.
केएसएने परदेशी खेळाडूंना फुटबॉल हंगामात खेळवण्यास मनाई केल्याने फुटबॉल संघांचे सारे अर्थचक्रच बदलले आहे. संघातून खेळण्यासाठी स्थानिक व जिह्याबाहेरील खेळाडूंकडून मागितल्या जात असलेल्या मोठ्या रकमेच्या मानधनामुळे संघ व्यवस्थापन हडबडले आहे. परंतू संघ मजबूतीसाठी संघ व्यवस्थापनाने स्थानिक स्टार आणि जिह्याबाहेरील खेळाडूंची मोट बांधली आहे. संघातून खेळण्यासाठी खेळाडूंशी बारगेनिंग कऊन त्यांना हंगामासाठी हजारो ऊपये मानधन देण्याची तयारी संघ व्यवस्थापनाने केली आहे. जिह्याबाहेरील खेळाडूंना संघांतून खेळण्यासाठी महिन्याला 50 हजार ते 80 हजार ऊपयांचे मानधन मिळेल. त्यामुळे यंदाच्या फुटबॉल हंगामासाठी सर्व संघ व्यवस्थापनांना मिळून देन कोटी ऊपये मोजावे लागणार आहेत. काही खेळाडूंना ठरलेल्या मानधनापैकी थोडी रक्कम संघ व्यवस्थापनाने संचकार म्हणून दिलेली आहे.
जिह्याबाहेरील नोंदणीकृत खेळाडूंची नावे खेळाडूंनी नोंदणी केलेल्या संघांची नावे
फ्रँकी अलेक्झांडर डेविड (पुणे) वर्षाविश्वास तऊण मंडळ
विकी चरणसिंग रजपूत (वाई, जि. सातारा) वर्षाविश्वास तऊण मंडळ
नबी हुसेन खान (बेलुरमठ, पश्चिम बंगाल) पाटाकडील तालीम मंडळ (अ)
विशाल अभिमन्यू कुरणे (सांगली) वेताळमाळ तालीम मंडळ
लवप्रित बलबीर सिंग (साहिब, पंजाब) सम्राटनगर स्पोर्टस्
रोशन अशोक रिखामे (अहिल्यानगर) उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम
मनिकंडन मुऊगण के (इदुकी) वेताळमाळ तालीम मंडळ
सत्पाल प्रकाश सिंह (पंजाब) शिवाजी तऊण मंडळ
शिबीन साद मन्नामबेत (कानपूर) खंडोबा तालीम मंडळ
विनोद जान्सन जे (तिऊअनंतपूरम) दिलबहार तालीम मंडळ
देबाजित नारायण घोषाल (हावडा) खंडोबा तालीम मंडळ
थुलंगा बीजव ब्रह्मा (कोक्राझार, आसाम) वेताळमाळ तालीम मंडळ
भवानी मारच्यू जैस्वार (आझमगड, उत्तरप्रदेश) संयुक्त जुना बुधवार पेठ
सोहल बशीर मकानदार (सांगली) बीजीएम स्पोर्टस्
शुभम संजय रखवालदार (सांगली) बीजीएम स्पोर्टस्
निवृत्ती सुनील पावनोजी (कडोली, बेळगाव) पाटाकडील तालीम मंडळ (अ)
सुभा बिजोय घोष (नार्थ 24 परगणा) खंडोबा तालीम मंडळ
रघवीर नेतार सिंग (फतेहगड) सम्राटनगर स्पोर्टस्
बिकास सुसांता मोंडल (साऊस 24 परगणा) प्रॅक्टीस फुटबॉल क्लब
हरिकांता सुरजकुमार शर्मा (इम्पाळ वेस्ट, मनिपूर) झुंझार क्लब
रिचलचंद्र हंदिकी (जम्मू) प्रॅक्टीस फुटबॉल क्लब
सनवीर रामलोकसिंग सिंग (मोहाली-पंजाब) संयुक्त जुना बुधवार पेठ
तौहिद रियाज मालाडी (सांगली) बीजीएम स्पोर्टस्
अभिषेक मंगलसिंग (श्री मुक्कसर) सम्राटनगर स्पोर्टस्
ऐन्स श्रीराम शर्मा (बेल्लारी-कर्नाटक) संध्यामठ तऊण मंडळ
अपुर्व शेखर शेट्टी (बेळगाव) संध्यामठ तऊण मंडळ
आनंदु पी गोबन (हिझकीपोनपोऊथू) फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ
संता टोंबा यमलेमबाम (इम्फाळ) शिवाजी तऊण मंडळ
खांजेबम विश्वामित्र बिमल मैतेई (इम्फाळ) शिवाजी तऊण मंडळ
थंगजम मनिमत्तम सिंग (थोबल) झुंजार क्लब
जेबीषण लॅम्बर्ट (थूथूर) दिलबहार तालीम मंडळ
सुमित सुभाष घोष (बीरपूर) प्रॅक्टीस फुटबॉल क्लब
रोमनसिंग तोहिबासिंग नैरोबम (इम्फाळ) बालगोपाल तालीम मंडळ
अंशिदअली एम अली मोहंमद मलमपूर पाटाकडील तालीम मंडळ (अ)
मोहंमद साबीर खान (बेळगाव) पाटाकडील तालीम मंडळ (ब)
एस. के. रिंकू खोखो सेठ (कोलकाता) संयुक्त जुना बुधवार पेठ
अलेक्स आकाश अंजूम मेंडल (कोलकाता) दिलबहार तालीम मंडळ
अलेश शिवदास सावंत (गोवा) फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ
सिद्धांत गणेश शिरोडकर (गोवा) फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ
अभिजीत एस विजयन (मलपूरम) पाटाकडील तालीम मंडळ (ब)
एल. टी. एल. टीमॉन लवली (सेनापली) बालगोपाल तालीम मंडळ
लोयन गांबा नाबचंद्र सिंग, अकोजीम (थोबल) बालगोपाल तालीम मंडळ