महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

चालता-फिरता पब आहे ही रेल्वे

06:28 AM Jan 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

7 तासांचा आकर्षक प्रवास

Advertisement

सर्वसाधारणपणे लोकांना जेव्हा पार्टी करण्याची इच्छा होते, तेव्हा ते क्लब किंवा पबमध्ये जात असतात. तेथील आकर्षक लाइटिंग आणि म्युझिकदरम्यान खाऊन पिऊन लोक आनंद घेत असतात. यासाठी रितसर प्लॅन करून लोक क्लबमध्ये जातात. परंतु एक अशी जागा आहे, जी टॅव्हल मीडियम असली तरीही तेथे पार्टी चालते.सध्या सोशल मीडियावर एका अशाच रेल्वेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही रेल्वे प्रवासात चालत्या-फिरत्या नाइट क्लबचा आनंद मिळवून देत आहे. या रेल्वेत बसण्यासाठी सीट मिळाल्यावर तुम्हाला येथील वातावरण पूर्णपणे क्लबसारखे दिसून येणार आहे.

Advertisement

ही रेल्वे जर्मनीत नूर्नबर्ग येथून रवाना होते. विशेषकरून संध्याकाळच्या वेळी चालणारी टेक्नो ट्रेन नूर्नबर्ग 7 तासांच्या नॉन स्टॉप प्रवास घडविते. या ठिकाणाला स्वत:च्या संस्कृतीसाठीच ओळखले जाते. प्रवाशांना जर्मनीतील ग्रामीण आणि दुर्गम भागांचे सुंदर दृश्य दाखवत ही रेल्वे सकाळपर्यंत म्युनिचमध्ये दाखल होते. लोक संध्याकाळीच या रेल्वेचे तिकीट घेत आत शिरतात आणि 7 तासांपर्यंत नाइटक्लबचा आनंद घेत असतात. जोरदार म्युझिक आणि लाइट्स असलेल्या या रेल्वेतून प्रवास करणे खरोखरच एक अनोखा अनुभव आहे.

सोशल मीडियावर या रेल्वेच्या व्हिडिओला आतापर्यंत 68 लाखाहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. तर 4 लाखाहून अधिक लोकांनी याला लाइक केले आहे. व्हिडिओवर कॉमेंट करत लोकांनी याला अनोखी आणि मजेशीर गोष्ट ठरविले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article