निसर्गाचा चमत्कार आहे हे ठिकाण
अत्यंत अनोखी आहे खडकांची रचना
अमेरिकेतील प्रांत अॅरिझोनमध्ये ‘व्हाइट पॉकेट’ हा निसर्गाचा एक चमत्कारच आहे. हे ठिकाण अनोख्या खडकांची रचना आणि संरचनासाठी ओळखले जाते. याचे वैशिष्ट्या म्हणजे पांढऱ्या आणि लाल रंगाच्या घुमावदार पॅटर्न आहे. हे पॅटर्न गोठलेल्या लाटांप्रमाणे दिसत असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. या ठिकाणाला ‘ब्रेन रॉक्स’साठी देखील ओळखले जाते. या ठिकाणावर लोकांना अन्य ग्रहावर पोहोचल्याची अनुभूती होत असते. आता व्हाइट पॉकेट अॅरिझोनाशी निगडित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत पांढऱ्या आणि गुलाबी रंगात पर्वतांना पाहिले जाऊ शकते. या खडकांना पाहून तुम्ही जणू मोठा केक पाहत असल्याचे वाटू लागते. अॅरिझोनामध्ये व्हाइट पॉकेट एक आश्चर्यकारक जियोलॉजिकल संरचना असून यात अलौकिक खडक असून ते मेंदू आणि अन्य आकृतींशी मिळतेजुळते आहेत. याचमुळे या पर्वतांना कधीकधी ब्रेन रॉक्स देखील म्हटले जाते.
व्हाइट पॉकेट उत्तर अॅरिझोनामध्ये वर्मिलियन क्लिप्स नॅशनल मॉन्युमेंटमध्ये एक जियोलॉजिकल फॉर्मेशन आहे. हे पारिया कॅन्यन-वर्मिलियन क्लिप्स वाइल्डरनेस एरियात स्थित आहे. हा एक संरक्षित भाग असून लोक पायी हिंडत या ठिकाणाचे सौंदर्य अनुभवत असतात. या ठिकाणी जाण्याची सर्वोत्तम वेळ ऑक्टोबर ते जून आहे.
छायाचित्रणासाठी व्हाइट पॉकेट एक उत्तम ठिकाण आहे. हे क्षेत्र एक लपलेले रत्न असून यात आश्चर्यजनक दृश्य आणि पर्वत असल्याचे काही लोकांचे सांगणे आहे. हे क्षेत्र निसर्गाचा एक चमत्कार असून तुम्ही एखाद्या दुसऱ्या ग्रहावर पोहोचल्याचा भास येथे होत असल्याचे अन्य काही जणांचे म्हणणे आहे.