For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलिया संसदेच्या छतावर ‘फ्री पॅलेस्टाइन’चे पोस्टर

07:00 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलिया संसदेच्या छतावर ‘फ्री पॅलेस्टाइन’चे पोस्टर
Advertisement

काळ्या कपड्यांमधील निदर्शक आत घुसले : मुस्लीम खासदार निलंबित

Advertisement

वृत्तसंस्था /कॅनबरा

ऑस्ट्रेलियात गुरुवारी पॅलेस्टिनी समर्थकांनी संसदेच्या छतावर ‘फ्री पॅलेस्टाइन’ असा मजकूर असलेली पोस्टर्स झळकविली आहेत. काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेल्या 4 जणांनी संसदेत घुसून छतावर जात फ्री पॅलेस्टाइन अशा घोषणा दिल्या आहेत. त्यांच्या हातात पोस्टर्स होती, ज्यावर ‘फ्रॉम रिव्हर टू सी, पॅलेस्टाइन विल बी फ्री’ असा संदेश होता. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करण्याची अनुमती आहे. परंतु जर कुणी आमच्या लोकांचा सन्मान करत नसेल आणि लोकांचे जीव धोक्यात आणत असेल तर त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे.

Advertisement

पंतप्रधान एंथनी अल्बानीज यांच्या सरकारने स्वत:च्या पक्षाच्या मुस्लीम खासदार फातिमा पयमान यांना निलंबित केले होते. फातिमा यांनी पॅलेस्टाइनला स्वतंत्र देशाचा दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या प्रस्तावाचे समर्थन केले हेते. निदर्शक रेनेगेड अॅक्टिव्हिस्ट ग्रूपशी संबंधित होते. हे निदर्शक एक तासापर्यंत संसदेच्या छतावर ठाण मांडून होते आणि पोस्टर्स झळकवित होते. यातील एका पोस्टरवर ‘ज्या भूमीवर बळजबरीचा कब्जा आहे, तेथे कधीच शांतता नांदू शकत नाही’ असे नमूद होते. तसेच त्यांनी  पंतप्रधान एंथनी अल्बानजी यांच्यावर  युद्धात इस्रायलला साथ दिल्याचा आरोप केला आहे.

Advertisement
Tags :

.