हा जीव कधीच मरत नाही
अब्जावधी वर्षांपासून जिवंत
या पृथ्वीवर ज्याचा जन्म झाला, त्याचा मृत्यू होणारच असे बोलले जाते. परंतु या पृथ्वीवर एक असा जीव आहे जो ही धारणा फेटाळतो. खोल समुद्रात आढळणारा हा जीव जैविक स्वरुपात कधीच मरत नसल्याचे बोलले जाते.
या जेलीफिशचे नाव ट्यूरिटोप्सिस डोहरनी आहे. याला सोप्या भाषेत ‘अमर जेलिफिश म्हटले जाते. हा अत्यंत अनोखा सागरी जीव स्वत:च्या आकर्षक जीवनचक्र आणि अनोख्या रिजनरेटिव्ह क्षमतांसाठी ओळखला जातो. जेथे प्रत्येक जीव जन्मानंतर मृत्यूच्या दिशेने प्रवास करू लागतो. तर हा जीव मृत्यूच्या समीप पोहोचण्यापूर्वीच स्वत:ला पुन्हा अशा स्वरुपात विकसित करून घेतो, जसे एक नवे मूल जन्मले असेल.
दोन टप्प्यांमध्ये जीव
या जीवाचे पूर्ण जीवनचक्र दोन टप्प्यांमध्ये असते. पहिले पॉलिप स्टेज आणि दुसरे मेडुसा स्टेज. याच दोन्ही स्टेजंमध्ये हा जीव स्वत:चे आयुष्य जगतो. ट्यूरिटोप्सिस डोहरनीचे जीवन पॉलिपच्या स्वरुपात सुरू होते. या अवस्थेत हा जेलिफिश सागरी तळावर चिकटून राहतो आणि विकसित होत राहतो. तर मेडुसा स्टेजमध्ये हा जेलिफिश मोठा होतो आणि समुद्रात तरंगू लागतो. या अवस्थेत हा जेलिफिश प्रजनन करू लागतो आणि अंडी देऊ लागतो.
स्वत:ला करतो अमर
ट्यूरिटोप्सिस डोहरनी जेलिफिशच्या आत एक वैशिष्ट्या असते. हा जेलिफिश स्वत:च्या पूर्ण शरीराला पुन्हा विकसित करू शकतो. म्हणजेच या जेलिफिशच्या शरीराचा एखादा अवयव किंवा अंग जखमी किंवा खराब झाल्यास हा फिश याला त्वरित विकसित करून घेतो. एका निश्चित काळानंतर हा जेलिफिश वृद्ध होऊ लागतो तेव्हा हा मेडुसा स्टेजमधून पॉलिप स्टेजमध्ये पोहोचतो आणि स्वत:च्या पूर्ण शरीराला नव्याने निर्माण करतो. या प्रक्रियेला ‘ट्रान्सडिफरेंशिएशन’ म्हटले जाते.