महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ही रात्र वैऱ्याची !

06:35 AM Jan 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

देशात नुकतीच झालेली रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा ही अनेक समाजकंटक तसेच दहशतवादी संघटनांच्या डोळ्यात खुपत आहे. त्यातच येऊ घातलेल्या सार्वजनिक निवडणुका पाहता देशात घातपाती कारवाया घडवून आणण्याचा घातकी कट आखला जात असणार हे निश्चित. यामुळे डोळ्यात तेल घालून सुरक्षेसाठी तपास यंत्रणा सज्जा झाल्या आहेत. कारण ही रात्र वैऱ्याची आहे.

Advertisement

Advertisement

‘न भुतो न भविष्यती’ असा चमत्कार देशात घडला आहे. गेली कित्येक वर्षे देशातील जनता ज्या क्षणाची वाट पाहत होती. अखेर तो क्षण आला आणि देशातील प्रत्येकजण या इतिहासाचा साक्षीदार बनला. अयोध्यात रामलल्लाची मोठ्या जल्लोषात आणि आनंदमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी संपूर्ण देशात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. जिकडे पाहावे तिकडे जय श्रीरामाचे नारे साऱ्या आसमंतात गुंजत आहेत. वास्तविक पाहिले तर देशात 2024 हे वर्ष म्हणजे अनेक घडामोडींचे आणि धामधुमीचे आहे. या वर्षात लोकसभा निवडणुका, राज्यातील विधानसभा निवडणुका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. यामुळे याचा सर्व ताण हा सरकारी यंत्रणांवर येणार तर आहेच, मात्र याचा जास्तीत जास्त ताण हा देशातील तपास यंत्रणांवर असेल. परिणामी देशातील या धामधुमीचा फायदा उचलण्यास काही समाजकंटक आणि दहशतवादी संघटना टपून बसल्या असल्याने ही रात्र वैऱ्याची आहे.

गेल्या अनेक दिवसात मोठ्या घडामोडी घडत आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर सातत्याने धमकीचे फोन सुऊ आहेत. भलेही या सध्या अफवा असल्या तरी यामुळे मुंबई पोलीस दल किती सतर्क आहे, हे पाहिले जात आहे. मात्र या अफवांनादेखील मुंबई पोलीस दल पुऊन उरले आहे. अफवा पसरविणाऱ्याच्या देखील पोलिस दलाने मुसक्या आवळल्या आहेत. कारण पुन्हा एकदा इतिहासाची पुनुरावृत्ती करायची नाही, हे पोलीस दलाला चांगलेच मा]िहत आहे. 26 नोव्हेंबर 2008 साली झालेल्या हल्याची पूर्व माहिती तुटक स्वऊपात पोलीस दलाला होती. त्यानुसार त्यांनी बंदोबस्तदेखील वाढविला होता. मात्र अनेक दिवस काहीच न घडल्याने, हा बंदोबस्त काढला. यामुळे दहशतवाद्याचे फावले. हा इतिहास ताजा असल्याने, मुंबई पोलीस दल अहोरात्र डोळ्यात तेल घालून मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध आहेत. मुंबई पोलिसांचे नेतृत्व सध्या धडाकेबाज पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या हातात असल्याने त्यांचे बारीक लक्ष आहे. आधी कर्तव्य खाकीचे मगच कुटुंबियाचे हा खाक्या पोलीस आयुक्तांचा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कर्तव्य बजावत असलेला प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील तितकाच सतर्क आहे. यामुळे मुंबईकडे कोणी वाकडी नजर करणार नाही अशी दहशत सध्या पोलीस आयुक्तांनी ]िनर्माण केली आहे. तर आम्हाला हेच पोलीस आयुक्त हवेत अशी भावना पोलीस दलात आहे.

तसेच दुसरीकडे मुंबईला लागुन असलेल्या शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून  आयएस या दहशतवादी संघटनांची पिल्लावळ जन्माला आली आहे. या पिल्लावळीने आपली स्वत:ची दहशत निर्माण करण्यासाठी भिवंडीतील पडघा या गावाला अल शाम असे घोषीत केले. अल शाम म्हणजे पडघा हे गाव ना देशात येतं ना कोणत्या देशाची सत्ता येथे चालणार. एवढ्यापर्यंत मजल या गावात राहणाऱ्या दहशतवाद्यांची गेली होती. मात्र या सर्वांवर नजर होती ती राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए). संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात घातपात घडवून आणण्याचा घातकी कट आखला जात असल्याची माहिती मिळताच, एनआयए तत्काळ जागृत झाली. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने आणि राज्य एटेएसच्या मदतीने एनआयएने पहाटेच्या दरम्यान, पडघा गावात धाव घेतली. गावाच्या सर्व सीमा बंद करीत, येथून जवळपास 40 च्या वर दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. यादरम्यान, पडघा गावात मोठ्या प्रमाणात बाहेरील संशयीतांनी आश्रय घेतल्याचे निदर्शनास आले. एवढेच नाही तर ज्याप्रमाणे पडघा गाव अल शाम म्हणून घोषीत केले. त्याप्रमाणे त्यांच्या निशाण्यावर देशाची आर्थिक राजधानी होती. तसेच देशातील अनेक शहरांवर त्यांना ताबा मिळवायचा होता. यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांना बाहेऊन सर्व मदत मिळत होती. तसेच येथील नागरिकांचा देखील पाठिंबा मिळत होता. मात्र वेळीच एनआयएने याचा भांडाफोड केला. या संशयीतांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाला आहे. पडघा गाव हे सिरियापर्यंत प्रसिद्ध झाले आहे. सिरियातून या गावात शस्त्रs, पैसा आदी स्वऊपांची मदत सुऊ होती. एवढेच नाही तर या ठिकाणी दहशतवादी कॅम्पदेखील सुऊ करण्यात आले होते. अगदी मुंबईच्या शेजारी हे सर्व सुऊ होते. मात्र या सर्वांवर एनआयएची नजर होती.

एनआयएने भलेही यातील मास्टरमाईंडला अटक केली असली तरी अद्यापही त्यांची पिल्लावळ बाहेर मोकाट फिरत आहे. भविष्यात येऊ घातलेल्या सार्वजनिक निवडणुका दरम्यान ही पिल्लावळ घातकी कट आखत असल्याने, त्यांचा युद्धपातळीवर शोध सुऊ आहे. काही कऊन या वर्षात देशात दहशतवादी हल्ले घडवून आणायचेच असा चंग या दहशतवादी संघटनांनी बांधला आहे. यामध्ये अद्याप बिळात लपून बसलेला घाबरट दाऊद इब्राहीमदेखील कमी नाही. वास्तविक पाहता दाऊद आता म्हातारा झाला आहे. त्याची अवस्था सध्या दात काढलेल्या वाघासारखी झाली आहे. यामुळे तो काहीच करणार नाही. याउलट त्याच्या कुटुंबियात आणि टोळीत दाऊदनंतर वर्चस्व कोणाचे? यावऊन वाद सुऊ आहेत. अनिसने एकप्रकारे दाऊदची सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न सुऊ केला आहे. तर दुसरीकडे वेळप्रसंगी अनिसचा काटा काढण्याचा कट दाऊदचा खास हस्तक शकीलने रचला आहे. यासाठी त्याने मुन्ना झिंगाडाला तयार ठेवले आहे. दुसरीकडे देशातील सर्व तपास यंत्रणांना दाऊदने त्याच्या मूळापासून लांब ठेवण्यासाठी मौलानाचा बुरखा चढविला आहे. जेणेकऊन या बुरख्याआडुन तो दाऊदचे साम्राज्य सांभाळू शकेल. मात्र दाऊद नंतर डी टोळीचे अस्तित्व धुळीस मिळणार हे नक्की. मात्र सध्याची वास्तविकता पाहिली तर पाकिस्तानी आयएसआयला देखील दाऊद नको आहे. कारण लंगड्या घोड्याला सांभाळणे म्हणजे स्वत:चा आत्मघात कऊन घेण्यासारखे आहे. यामुळे दाऊद मेला काय? आणि जगला काय? याचे काहीएक सोयरसुतक ना आयएसआयला आहे, ना भारतीय तपास यंत्रणांना आहे. कारण मेलेल्याला आणखी कोण मारणार? अशी परिस्थिती सध्या दाऊदची आहे. मात्र दाऊद नंतर स्वत:चे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अनेकजण पुढे येतील. आयएसआयच्या नजरेत स्वत:ला सिद्ध करायचे असेल तर या सर्वापुढे एकच पर्याय उरतो, तो म्हणजे देशात घातपाती कारवाया करणे. यामुळे देशातील तपास यंत्रणांना सतर्क राहणे आवश्यक आहे. कारण ही रात्र वैऱ्याची आहे.

  - अमोल राऊत

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article