महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हे अखेरचे...पुन्हा हात पसरणार नाही !

06:38 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांचे प्रतिपादन : आयएमएफच्या दारी पुन्हा पॅकेजसाठी धाव

Advertisement

वृत्तसंस्था / इस्लामाबाद

Advertisement

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जनतेला आमचे सरकार पाकिस्तानची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याचे आश्वासन दिले आहे. विदेशी अर्थसहाय्य आणि बेलआउट पॅकेजवरील निर्भरता कमी करत शेजारी देशांना आर्थिक आघाडीव मागे टाकू. आयएमएफचे हे बेलआउट पॅकेज पाकिस्तानच्या इतिहासातील अखेरचे पॅकेज ठरेल अशी अपेक्षा असल्याचे शाहबाज यांनी स्वत:च्या सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त देशाला संबोधित करताना म्हटले आहे.

पाकिस्तानचे सरकार स्वत:च्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आयएमएफसोबत आणखी एक बेलआउट पॅकेजसाठी चर्चा करत आहे. हे पॅकेज 6-8 अब्ज डॉलर्सचे असू शकते. अलिकडेच सादर झालेल्या पाकिस्तानी अर्थसंकल्पात आयएमएफच्या अटींनुसार धोरणनिर्मितीचा प्रयत्न करण्यात आला होता.

आमचे सरकार पुढील 5 वर्षांमध्ये अनावश्यक खर्च कमी करणार आहे. तसेच युवांसाठी उत्तम शिक्षण तसेच कौशल्यासाठी नवी धोरणे तयार करत ती लागू करण्यावर काम करत आहे. याचमुळे हे पाकिस्तानच्या इतिहासातील अखेरचे बेलआउट पॅकेज ठरेल असे शाहबाज यांनी म्हटले आहे.

ठरविण्यात आलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आम्हा सर्वांना स्वत:च्या देशाकरता काही प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे. हा मार्ग अडचणींनी भरलेला आहे, परंतु आमचे सरकार या सुधारणा करण्यावर ठाम आहे. जनतेसाठी कुठलेच काम न करणाऱ्या आणि देशाकरता भारत ठरलेल्या सर्व संस्था, विभाग आणि मंत्रालयांना आम्ही बंद करणार आहोत असे पाक पंतप्रधानांनी म्हटले आहे.

4 मार्च रोजी आमचे सरकार सत्तेवर आले. तेव्हा 38 टक्के असलेला महागाई दर आता 12 टक्क्यांवर आला आहे. तसेच कर्जावरील व्याजदर 22 टक्क्यांवरून कमी होत 20.5 टक्क्यांवर आाल आहे. फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू 100 टक्के डिजिटलाइज्ड होणार आहे. प्रत्येक दहशतवादी, तस्कर आणि करचोर अर्थव्यवस्थेचा शत्रू आहे. सरकार आणि जनतेने संयुक्तपणे प्रयत्न केले तरच पाकिस्तान या कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू शकेल असे वक्तव्य शाहबाज यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article