For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंगापूर ते थायलंडपर्यंत धावणारी महिला

06:44 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिंगापूर ते थायलंडपर्यंत धावणारी महिला
Advertisement

12 दिवसांपर्यंत पूर्ण केला हजार किमीचा प्रवास

Advertisement

वाढत्या वयासोबत आरोग्याची काळजी न घेतल्यास भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा स्थितीत चालणे आणि धावणे सर्वात चांगले आणि स्वस्त व्यायाम प्रकार आहेत. या सवयी स्वत:ला लावून घेतल्या तर अत्यंत आरामात स्वत:चे जीवन जगू शकता. अशाच एका धावण्याच्या शौकिन असलेल्या महिलेने लोकांना चकित केले आहे.

लोकांना मॅराथॉनमध्ये धावताना तुम्ही पाहिले असेल. तेथे 5-10 किंवा फार तर 20-25 किलोमीटर अंतरापर्यंत धावावे लागते. परंतु एका महिलेने 5-6 किलोमीटर नव्हे तर एकूण 1 हजार किलोमीटर अंतर धावत कापले आहे. ती धावता-धावता सिंगापूरमधून थायलंडमध्ये पोहोचली आहे. तिने हा प्रवास धावत केवळ 12 दिवसांमध्ये पूर्ण केला आहे.

Advertisement

52 वर्षीय नताली दऊ नावाच्या महिलेने सर्वात जलदपणे 1 हजार किलोमीटरची मॅराथॉन पूर्ण केली. स्वत:चे नाव मलेशियाला पायी सर्वात वेगाने ओलांडणाऱ्या मॅराथॉन रनरच्या स्वरुपात गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद हावे यासाठी ती प्रयत्नशील आहे. सिंगापूर ते थायलंडमधील अंतर धावून पूर्ण करण्यासाठी लागलेले 12 दिवस तिच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक राहिले. दरदिनी तिला वेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागले. उन्हाळ्यामुळे तिचे बूट्स वितळत होते. तर तिला यूरिनरी इंफेक्शनला तोंड द्यावे लागले तरीही तिने हे चॅलेंज पूर्ण केले आहे.

नताली अल्ट्रा रनर असून तिने केलेला सराव याकरता उपयुक्त ठरला आहे. वयाच्या 40 व्या वर्षापासून तिने अॅथलिट म्हणून स्वत:चा प्रवास सुरू केला. ती छोट्या-छोट्या मॅराथॉनपासून मोठे अंतर व्यापण्याचा सराव करायची. अशाप्रकारचे आव्हान पेलण्यासाठी मानसिक बळ आवश्यक असते. अनेकदा हार पत्करावी असे वाटत असते. अशा स्थितीत स्वत:ला उत्साह देण्याची गरज असते असे नतालीने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.