कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हा आहे ‘पिझ्झ्या’चा बाप

03:37 PM Aug 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘पिझ्झा’ हा इटालियन खाद्यपदार्थ भारतातही चांगलाच लोकप्रिय झाला आहे. केवळ भारतातच नव्हे, तर साऱ्या जगात त्याने बऱ्याच काळापासून नाव कमावले आहे. त्यामुळे या खाद्यपदार्थाचे नाव निघाले, की आपल्याला इटली या देशाचीच आठवण होते. तथापि, भारताच्या राजस्थान राज्यातही ‘पिझ्झा’ विशेष भारतीय पद्धतीने बनविला जातो, हे फारच थोड्या जणांना माहीत असेल. विशेष म्हणजे या राजस्थानी पिझ्झ्याचा इतिहास कदाचित इटलीच्या पिझ्झ्यापेक्षाही जुना असू शकतो. कारण, हा खाद्यपदार्थ राजस्थानात शतकानुशतकांपासून बनविला जात आहे. त्याचा जन्म केव्हा झाला, हे निश्चितपणे कोणालाही सांगता येणे अशक्य आहे.

Advertisement

हा खाद्यपदार्थ राजस्थानच्या ग्रामीण भागात विशेषत्वाने लोकप्रिय आहे. त्याला ‘रामरोटा’ असे नाव आहे. तो प्रमुखत: मका आणि बाजरीच्या पीठापासून बनविला जातो. तो तव्यावर खरपूस भाजला जातो आणि तो देशी तूप, मसाले आणि स्थानिक भाज्या यांनी युक्त असतो. कांदा, हिरवी मिर्ची आणि कोथिंबीर हे पदार्थ रामरोटा बनविताना उपयोगात आणले जातात. इटलीच्या पिझ्झ्यासारखाच दिसणारा आणि असणार हा पदार्थ पिझ्झ्यापेक्षाही अधिक चवदार आणि पौष्टिक असतो, असे हे दोन्ही पदार्थ चाखलेल्यांचे म्हणणे असते. थोडक्यात सांगायचे तर विदेशी पिझ्झ्याच्या ‘तोंडात मारेल’ असा हा ‘रामरोटा’ आहे. तो साधारणत: लसणाची चटणी, टॉमॅटोची चटणी किंवा ताक यांच्यासमवेत खाल्ला जातो. तो इतका चवदार असतो, की त्याची चट लागते आणि एकदा खाल्ला की वारंवार मागितला जातो. कुरकुरीतपणा, खमंगपणा आणि झणझणीतपणा या तीन्ही कसोट्यांवर तो इटलीच्या पिझ्झ्यापेक्षा सरस ठरतो, असेही अनुभवी खवय्यांचे म्हणणे असते.

Advertisement

ग्रामीण राजस्थानात हा केवळ एक पोटभरीचा खाद्यपदार्थ म्हणून पाहिला जात नाही, तर तो सांस्कृतीचे प्रतीक आहे. हा पदार्थ केवळ पुरुषच बनवितात. हे देखील त्याचे आणखी एक वैशिष्ट्या आहे. ग्रामीण राजस्थानमधील स्नेहभोजने, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, घरगुती कार्यक्रम, लग्नसमारंभ आणि इतर अशा कार्यक्रमांमध्ये दिल्या जाणाऱ्या भोजनांमध्ये हा पदार्थ हटकून असतो. तो नसेल तर भोजन अपुरे मानले जाते. याची पिझ्झ्याशी तुलना केली जाते, कारण त्याची बनविण्याची प्रक्रिया पिझ्झ्यासारखीच आहे. तो त्यासारखाच दिसतो. पण त्याचे अंतरंग काहीसे भिन्न आहे. हा पदार्थ भारतात इतरत्र आणि जगातही लोकप्रिय बनविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून ते यशस्वी होत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article