महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ही आमची अखेरची निवडणूक, विजयी करा

05:37 AM Nov 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मतदारांदरम्यान उमेदवारांकडून सहानुभूती कार्ड

Advertisement

मध्यप्रदेशातील प्रचाराच्या धामधुमीत राजकीय वातावरण चांगले तापू लागले आहे. निवडणुकीच्या मैदानात उभे असलेले उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान भिंड जिल्ह्dयातील दोन मतदारसंघांमधील 3 उमेदवार वेगळ्या प्रकारे मतदारांदरम्यान सहानुभूती कार्ड वापरून मते मिळवू पाहत आहेत.

Advertisement

हे तिन्ही उमेदवार मतदारांदरम्यान जाऊन आपली ही अखेरची निवडणूक असल्याने तुमचे बहुमूल्य मत देऊन विजयी करा असे आवाहन वारंवार करत आहेत. अशाप्रकारची घोषणा लहार मतदारसंघाचे 7 वेळा आमदार राहिलेले आणि मध्यप्रदेश विधानसभेतील वर्तमान विरोधी पक्षनेते  आणि काँग्रेस उमेदवार डॉ. गोविंद सिह यांच्याकडून स्वत:च्या समर्थकांच्या मदतीने मतदारांदरम्यान वारंवार केली जात आहे.

ही माझी आता अखेरची निवडणूक आहे. त्यामुळे कुठल्याही स्थितीत यावेळी विजयी करा, यानंतर मी निवडणूक लढविणार नसल्याचे गोविंद सिंह यांनी स्वत:च्या समर्थकांना आणि मतदारांना सांगितले आहे.

बसप उमेदवारही सामील

अशाचप्रकारची घोषणा भाजपमधून बंडखोरी करत बसपच्या तिकिटावर लहार मतदारसंघात निवडणूक लढविणारे रसाल सिंह देखील मतदारांसमोर करत आहेत. रसाल सिंह हे रौन मतदारसंघाचे 4 वेळा आमदार राहिले आहेत आणि मागील 2 वेळा त्यांनी लहार मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती, परंतु त्यांना दोन्हीवेळा पराभव पत्करावा लागला होता. यावेळी भाजपने त्यांना उमेदवारी नाकारून अंबरीश शर्मा यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. याचमुळे रसाल सिंह यांनी बंडखोरी करत बसपमध्ये प्रवेश केला आहे. अशा स्थितीत ते जनतेसमोर जाऊन आपली ही अखेरची निवडणूक असल्याने मत देऊन विजयी करा, अशी विनवणी करत आहेत.

काँग्रेस उमेदवाराकडून हाच प्रचार

भिंड मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार राकेश चौधरी यांच्याबाबतीतही हेच चित्र दिसून येत आहे. काँग्रेस उमेदवार राकेश चौधरी यांनी आतापर्यंत 7 वेळा विधानसभा निवडणूक लढविली असून 4 वेळा विजय मिळविला आहे. तसेच ते दिग्विजय सिंह यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. 2013 पूर्वी राकेश चौधरी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर 2018 च्या निवडणुकीत चौधरी हे भिंड येथे पराभूत झाले होते, यानंतर त्यांनी भाजपला रामराम ठोकून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी काँग्रेसने त्यांना भिंड मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. राकेश सिंह हे स्वत:च्या प्रचारात ही आपली अखेरची निवडणूक असल्याचे सांगून मत देण्याची विनंती करत आहेत. काँग्रेसचे दोन उमेदवार, बसपचा एक उमेदवार स्वत:करता सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article