100 वर्षांनी परतला हा प्राणी
आरामात करत होता जंगलाची सैर
पापुआ न्यू गिनीच्या रहस्यमय जंगलांमध्ये दिसून आलेल्या एका प्राण्यामुळे वैज्ञानिक आणि निसर्गप्रेमींचा उत्साह दुणावला आहे. 100 वर्षांनी वोंडिवोई ट्री कांगारू पुन्हा जिवंत झाला आहे. 1928 मध्ये अखेरचा दिसून आलेल्या या दुर्लभ प्राण्याला आता पापुआ न्यू गिनीच्या वोडिंवोई पर्वतांमध्ये पाहिले गेले आहे.
स्थानिक गाइडने झाडांवर उड्या घेत असलेल्या या प्राण्याचे चित्रण केले आहे. याचा व्हिडिओ पाहून वैज्ञानिक अचंबित झाले आहेत, कारण या प्राण्याला विलुप्त प्रजाती मानले गेले होते. हा कांगारू जंगलाची सैर करत असताना त्याला कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. ट्री कांगारू परिवाराचा हा सदस्य जगातील अनोखा मार्सुपियल आहे. जो जमिनीसोबत झाडांवरही राहू शकतो. याची लांब शेपटी संतुलन राखते. तर मजबूत पंजे झाडांवर चढणे सोपे करतात.
वोंडिवोई प्रजाती इंडोनेशियाच्या वेस्ट पापुआला लागून असलेल्या पापुआ न्यू गिनीच्या सीमेवर राहते. 1928 मध्ये डच वैज्ञानिकांकडून या प्राण्याची अखेरची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर अवैध शिकार, जंगलतोड आणि हवामान बदलामुळे हा प्राणी गायब झाला होता. याला आययूसीएन रेड लिस्टमध्ये ‘क्रिटिकल एंडेंजर्ड’च्या श्रेणीत सामील करण्यात आले होते, परंतु पुरावा न मिळाल्याने याला विलुप्त मानले गेले होते. परंतु हा दृष्टीस पडला आहे. हे पुनरागमन जैवविविधतेचा चमत्कार आहे. 90-100 वर्षांनी एक प्रजाती परतल्याने विलुप्त होणे म्हणजे केवळ आमच्या नजरेतून गायब होत असल्याचे सिद्ध होते असे उद्गार कंजर्वेशन इंटरनॅशनलचे संचालक डॉ. एलिझाबेथ बेनेट यांनी काढले आहेत.
अत्यंत अनोखा कांगारू
जिवंत प्रौढ प्राण्याला कॅमेऱ्यात रिकॉर्ड करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या शोधाचे पारिस्थितिक महत्त्व अपार आहे. पापुआ न्यू गिनीची जैवविविधता हॉटस्पॉट वोडिंवाई पर्वतरांगा जथे 1000 हून पक्षी प्रजाती आणि शेकडो सस्तन प्राणी आहेत. ट्री कांगारू बीज फैलावण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. फळ खाऊन बीज ते दूरवर नेत असतात. हा प्रकार जंगलाच्या वृद्धीसाठी आवश्यक आहे. परंतु धोका अद्याप कायम आहे. अवैध लॉगिंग, मायनिंग प्रकल्प आणि हवामान बदलामुळे जंगल आंकुचित पावत आहे. 2025 मध्ये पापुआ सरकारने या क्षेत्राला संरक्षित क्षेत्र घोषित केले.