थर्टी फस्ट,न्यू इयर सेलिब्रेशनसाठी तरूणाई सज्ज
कोल्हापूर :
नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. काहींनी नाताळाच्या सुट्टीला जोडून रजा काढल्या असून गोवा, कोकणातील हॉटेल्स बुकींग केले आहेत. आज, शनिवार म्हणजेच विकेंडपासूनच न्यू इयर सेलेब्रेशनचा बेत आखला आहे.
वर्षभरात आलेले चांगले-वाईट अनुभवाची शिदोरी घेऊन मंगळवारी (दि.31) 2024 या सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषामध्ये करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. यंदाही कोल्हापुरातील हॉटेल्स, लॉज आतापासूनच बुक झाले असून 31 डिसेंबरपर्यंत पर्यटकांची गर्दी वाढतच राहणार अशी स्थिती आहे. नातळाच्या सुट्ट्यापासूनच शहर पर्यटकांनी बहरले असून सर्वच पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत.
यंदा 31 डिसेंबर हा मंगळवारी आला आहे. काहीजण मंगळवारचे मांसाहार खात नाहीत. त्यांनी उद्या रविवारीच न्यू इयर सेलीब्रेशनच बेत आखला आहे. तर काहींनी मंगळवारी शाकाहरी जेवणाचे नियोजन केले आहे. काहींकडून सलग सुट्ट्या घेत आज, शनिवार म्हणजेच विकेडपासूनच न्यू इयर सेलीब्रेशन करण्यात येणार आहे. यासाठी गोवा, कोकणामधील शिरोडा येथील समुद्र किनारावरील हॉटेल्सही बुकींग केले आहेत. आज, शनिवारी सकाळीच ते या ठिकाणी जाण्यासाठी रवाना होणार आहे. रविवार दि.29, सोमवार दि.30 आणि मंगळवारी दि.31 गोवा, कोकणामध्येच नव वर्षाचे सिलीब्रेशन करून 1 जानेवारीला कोल्हापुरात येणार आहेत.
याचबरोबर दरवर्षी प्रमाणे कोल्हापूर शहरातील तरूणांनी मंगळवारीच नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ठरलेल्यानुसार टेरसवर किंवा उद्यानामध्ये रस्सामंडळ पार्टीचाही बेत आखला आहे. काहींनी तर हॉटेलमध्ये आतापासून बुकींग करण्यात येत आहेत. डिजेच्या तालावर थिकरण्यासाठी त्यांच्याकडून नियोजन सुरू झाले आहे. हॉटेल्सनेही सुप्रसिद्ध डिजे आणले जाणार आहेत.. याचबरोबर मंगळवारी विशेष कार्यक्रमांसह स्पेशन मेनूचा बेत आखला आहे. काही हॉटेल्सने ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी स्किमचेही नियोजन केल्या आहेत. महिला बचत गटातील महिलांही एकत्र येऊन नववर्षाचे स्वागत करणार आहेत.
अनोख्या पद्धतीने होणार नववर्षाचे स्वागत
संभाजीनगर, गंगावेशसह शहरातील श्री स्वामी समर्थ भक्त यंदाही वर्षाअखेरीस अक्कलकोट वारी करणार आहेत. बुधवारी (ता. 1) सकाळी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन नव्या वर्षाची सुरुवात करणार आहेत. काही योगा ग्रुप योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवत जीवनातील योगासनांचे महत्त्वही अधोरेखित करणार आहेत मंगळवारी (ता. 31) पहाटे चार वाजता रंकाळ्याभोवती पाच प्रदक्षिणा पायी चालत कोल्हापूरकर पूर्ण करणार आहेत. कोल्हापूर वॉकर्स ग्रुपच्या या उपक्रमाचे 10 वे वर्ष आहे. पहाटे चार वाजल्यापासून ते पावणेआठ वाजेपर्यंत तब्बल चार तास चालून हा उपक्रम पूर्ण करणार आहेत. याची सुरुवात डी. मार्ट, रंकाळा येथून होणार आहे.