शहरातील पाणीपुरवठा सोमवारी राहणार बंद
कोल्हापूर :
महावितरणच्या वतीने बालिंगा उपसाकेंद्र येथील मुख्य वीज वाहिनीच्या मासिक देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा सोमवारी (30 डिसेंबर) बंद राहणार आहे. तर मंगळवारी (31 डिसेंबर) रोजी शहरात अपुरा पाणीपुरवठा होणार आहे.
बालिंगा सब स्टेशनच्या 110 केव्हीच्या मुख्य वीज वाहिनीचे मासिक देखभाल दुरूस्तीचे काम महावितरणच्या वतीने सोमवारी (30 डिसेंबर) रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारी बालिंगा उपसा केंद्राचा विद्युत पुरवठा संपुर्ण दिवसभ बंद रहाणार आहे. त्यामुळे संपुर्ण शहरातील ए, बी, वॉर्ड परिसरातील आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर परिसर, कणेरकरनगर परिसर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर परिसर, तुळजाभवानी कॉलनी परिसर, देवकर पाणंद परिसर, टेंभे रोड परिसर, शिवाजीपेठ परिसर ,चंद्रेश्वररगल्ली परिसर, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर परिसर, उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड परिसर, मंगळवार पेठ काही भाग, सी व डी वॉर्ड मधील दुधाळी परिसर, गंगावेश परिसर, उत्तरेश्वरपेठ परिसर, शुक्रवार पेठ परिसर, ब्रम्हपुरी परिसर, बुधवारपेठ तालिम परिसर, सिध्दार्थनगर परिसर, पापाची तिकटी परिसर, लक्ष्मीपुरी परिसर, शनिवारपेठ चौक परिसर, सोमवारपेठ परिसर, ट्रेझरी ऑफीस परिसर, बिंदुचौक परिसर, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक परिसर, उमा टॉकीज परिसर,महालक्ष्मी मंदीर परिसर, गुजरी परिसर, मिरजकर तिकटी परिसर, देवलक्लब परिसर व ई वॉर्ड मधील खानविलकर पेट्रोलपंप परिसर, शाहुपूरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक व सलग्नीत उपनगरे व ग्रामीण भागामध्ये सोमवार पाणी पुरवठा एक दिवस बंद राहणार आहे. तसेच मंगळवारी पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. तरी नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
15 दिवसांत 4 दिवस पाणी संकट
गेल्या आठवड्यात काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेस गळती लागल्यामुळे दोन दिवस पाणी पुरवठा ठप्प झाला होता. तर 1 दिवस बालिंगा येथील कामामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. आता या सोमवार, मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.