For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिसरा कार्यकाळ महिला सशक्तीकरणाला समर्पित

06:23 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
तिसरा कार्यकाळ महिला सशक्तीकरणाला समर्पित
Advertisement

ड्रोन वितरण कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

महिलांना सशक्त आणि आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकारकडून नवा पुढाकार हाती घेण्यात आला आहे. दिल्लीत आयोजित ‘सशक्त नारी-विकसित भारत कार्यक्रमा’दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1 हजार महिलांना ड्रोन सोपविले आहेत. भारतीय कृषी संशोधन संस्थेत आयोजित या कार्यक्रमात देशभरातील नमो ड्रोन दीदींनी भाग घेतला. ही योजना महिलांना आधुनिकतेसोबत कृषी क्षेत्रात स्वत:चे योगदान देता यावे याकरता सुरू करण्यात आली आहे. सरकार याकरता मोफत प्रशिक्षण देखील देत आहे.

Advertisement

हा कार्यक्रम महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीकोनातून अत्यंत ऐतिहासिक आहे. नमो ड्रोन दीदी अभियानाच्या अंतर्गत 1 हजार आधुनिक ड्रोन महिलांच्या स्वयंसहाय्य समुहांना सोपविण्याची संधी मिळाली आहे. आम्ही आता 3 कोटी लखपदी दीदीचा आकडा पार करणार आहोत. याच उद्देशाने आज 10 हजार कोटी रुपयांची रक्कम देखील या दीदींच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

कुठलाही देश असो किंवा समाज तो नारीशक्तीची प्रतिष्ठा वाढवत, त्यांच्यासाठी नव्या संधी उपलब्ध करूनच वाटचाल करू शकतो. परंतु दुर्दैवाने देशातील यापूर्वी राहिलेल्या सरकारांनी महिलांचे जीवन, त्यांच्या अडचणी सोडविण्यावर कधीच लक्ष दिले नाही. यापूर्वीच्या सरकारांनी महिलांना नशीबाच्या हवाली सोडले होते अशी टीका मोदींनी केली आहे.

आमच्या माताभगिनींना किंचित संधी मिळाली तरीही त्यांना कुणाच्या कृपादृष्टीची गरज भासत नाही. तर त्याच अन्य लोकांना सहाय्य करु शकतात. लाल किल्ल्यावरून मी जेव्हा महिला सशक्तीकरणाबद्दल बोललो, तेव्हा दुर्दैवाने काँग्रेससारख्या राजकीय पक्षांनी माझी थट्टा केली, माझा अपमान केला, असे उद्गार मोदींनी काढले आहेत.

मोदीच्या संवेदना आणि योजना तळागाळाशी निगडित जीवनाच्या अनुभवांमधून निर्माण झाल्या आहेत. बालपणी मी जे स्वत:च्या घरात पाहिले, शेजारी-पाजारी पाहिले, मग देशाच्या गावागावात अनेक कुटुंबांसोबत राहून जो अनुभव घेतला, तोच आज मोदीच्या संवेदना आणि योजनांमधून झळकतो. याचमुळे या योजना माझ्या माताभगिनींचे जीवन सुलभ करतात, त्यांच्या अडचणी कमी करतात असे मोदींनी म्हटले आहे.

महिलांच्या गरजांची घेतली काळजी

महिलांच्या कल्याणाबद्दल मी बोलू लागल्यावर काँग्रेसकडून मला शिव्या वाहिल्या जातात. परिवारवादी पक्ष कधीच सर्वसामान्यांच्या संघर्षाशी जोडून घेऊ शकत नाहीत. 2014 पासून महिलांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यांत त्यांना मदत करता येईल अशाप्रकारच्या योजना आखण्याचा मी प्रयत्न करत आहे. प्रसूतीपूर्व देखभालीपासून वित्तीय सेवांपर्यंत संपर्क मिळवून देत आम्ही महिलांच्या सर्व गरजांची काळजी घेतली आहे. मागील 10 वर्षांमध्ये ज्याप्रकारे भारतात महिला स्वयंसहाय्य समुहांचा विस्तार झाला आहे, तो अध्ययनाचा विषय आहे. या महिला स्वयंसहाय्य समुहांनी भारतात नारी सशक्तीकरणाचा नवा इतिहास रचला असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.

ड्रोन तंत्रज्ञानाचा होणार विस्तार

आगामी वर्षांमध्ये देशात ड्रोन तंत्रज्ञानाचा विस्तार होणार आहे. देशात नमो ड्रोन दीदींसाठी असंख्य मार्ग खुले होणार आहेत. नारीशक्ती 21 व्या शतकातील तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे. अंतराळ क्षेत्र, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र आणि विज्ञानाच्या क्षेत्रात महिला वारंवार यशाची शिखरं गाठत आहेत. जगात सर्वाधिक महिला कमर्शियल पायलट भारतातच आहेत. आगामी वर्षांमध्ये ड्रोनच्या वापराच्या असंख्य संधी निर्माण होतील. ड्रोन पायलट झालेल्या महिलांचे भविष्य उज्ज्वल असणार आहे. आमचा तिसरा कार्यक्रम महिला सशक्तीकरणावर एक नवा अध्याय लिहिणार असल्याचा विश्वास देऊ इच्छितो असे मोदींनी नमूद पेले आहे.

Advertisement
Tags :

.