For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आंदोलक शेतकऱ्यांशी आज चर्चेची तिसरी फेरी

06:55 AM Feb 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
आंदोलक शेतकऱ्यांशी आज चर्चेची तिसरी फेरी

चंदीगढमध्ये होणार बैठक : नव्या रणनीतीसह आंदोलक दिल्लीत घुसण्याच्या तयारीत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आपल्या मागण्या घेऊन दिल्लीकडे मोर्चा काढण्याच्या तयारीत असतानाच शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो’ मोर्चा थांबवण्यात आला आहे. याचदरम्यान शेतकरी संघटना आणि सरकारच्या प्रतिनिधींमध्ये सुरू असलेल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरत आहेत. आंदोलक शेतकरी गुऊवारी, 15 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा केंद्राशी तिसऱ्या फेरीतील चर्चा करण्याची शक्मयता आहे. गुऊवारी शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्यात तिसरी फेरी होणार आहे. बैठकीची नेमकी वेळ अद्याप ठरलेली नसली तरी ती दुपारी होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Advertisement

Advertisement

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी आणि पांगवण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सीमांवर सिमेंट आणि लोखंडाचे बॅरिकेडिंगही करण्यात आले आहे. या सीमांवर सिमेंट आणि लोखंडाचे बॅरिकेडिंगही करण्यात आले आहे. याशिवाय शेतकऱ्यांना रोखण्यासाठी काटेरी तारा आणि कंटेनरही ठेवण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी पुन्हा दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शेतकऱ्यांनी जाहीर केल्यानंतर अतिरिक्त सुरक्षा तैनात करून शेतकऱ्यांना अडविण्यात आले आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यात सुरू असलेल्या या संघर्षादरम्यान शेतकऱ्यांवरील पोलीस कारवाईवरून विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

आंदोलक शेतकऱ्यांनी मंगळवारी शंभू सीमेवरील बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला आणि हरियाणा पोलीस कर्मचाऱ्यांवरही दगडफेक केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी पाणी आणि अश्रुधुराचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. निदर्शनाच्या नावाखाली अशांतता पसरवण्यास परवानगी दिली जाणार नाही. शेतकऱ्यांना दिल्लीला जायचे असेल तर त्यांनी बस, टेन किंवा पायी जावे, आम्ही त्यांना ट्रॅक्टरने दिल्लीला जाऊ देणार नाही, असे हरियाणा पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.

अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याचा निषेध

हरियाणा पोलिसांकडून सतत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याचा शेतकरी नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे. जोपर्यंत हा अश्रूधुराचा मारा थांबत नाही तोपर्यंत केंद्राशी कोणतीही चर्चा होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा वातावरणात चर्चा होऊ शकत नाही, असे जगजित सिंग डल्लेवाल म्हणाले. पटियाला प्रशासनाच्या माध्यमातून केंद्राला शेतकऱ्यांशी बोलायचे आहे. शेतकरी नेत्यांनी घटनास्थळाची परिस्थिती पंजाब पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवली. हरियाणा पोलीस आणि निमलष्करी दल पंजाबमध्ये येऊन शेतकऱ्यांवर गोळीबार करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. याबाबत पटियाला येथील एसएसपींकडे लेखी तक्रारही करण्यात आली आहे.

काय म्हणाले कृषीमंत्री अर्जुन मुंडा?

शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री अर्जुन मुंडा यांनी सरकारची बाजू मांडली आहे. मी विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांना मदतीसाठी आणि बोलण्याचे आवाहन करू इच्छितो.

Advertisement
Tags :
×

.