सांबरा येथील स्मशानभूमीतील स्टॅण्ड चोरट्यांनी लांबविले
वार्ताहर/सांबरा
सांबरा येथील स्मशानभूमीतील स्टॅण्ड चोरट्यांनी लांबविले असून गैरसोय निर्माण झाली आहे. तरी ग्रामपंचायतीने तातडीने नवीन स्टॅण्ड बसवावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. येथील स्मशानभूमीमध्ये सर्व समाजाची मिळून चार स्टॅण्ड आहेत. त्यातील एक स्टॅण्ड गेल्या दीड-दोन महिन्यापूर्वी चोरीला गेले आहे. स्मशानभूमीतील पथदीप बंद करून रात्रीच्या वेळी चोरट्यांनी स्टॅण्ड लांबविले आहे. तसेच शेडवरील एक पत्राही उडून गेला आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार करताना गैरसोय निर्माण होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने नवीन स्टॅण्ड बसवावे व शेडवरील पत्रा बसवावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
लवकरच स्टॅण्ड बसविणार
याबाबत ग्रा. पं. उपाध्यक्ष मारुती जोगाणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नवीन स्टॅण्ड बसवण्यासाठी ग्रामपंचायतीतून दीड लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आल्याचे सांगितले व पुढील दहा-पंधरा दिवसात कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचेही म्हणाले.