For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हलगा येथे चोरट्यांचा उच्छाद

06:26 AM Dec 02, 2023 IST | Tarun Bharat Portal
हलगा येथे चोरट्यांचा उच्छाद
Advertisement

बेळगाव/ प्रतिनिधी

Advertisement

हालगा गावामध्ये गुरुवारी रात्री चोरट्यांनी एक किराणी दुकानासह तीन घरे फोडली. तर घरोघरी पार्किंग केलेल्या दोन दुचाकी चोरुन नेल्या तर एक दुचाकी वाटेत बंद पडल्याने ती तसेच सोडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे हालगा परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

गुरुवारी रात्री चोरट्यांनी तवनेश मरगौंडा यांचे किराणी दुकान फोडले. गल्ल्यातील 15 हजार रुपये आणि गुटखा, सिगारेट लांबविले आहेत. कंगळगौड आणि देसाई यांची घरे फोडली मात्र तेथे काहीही चोरट्यांच्या हाती लागले नाही. तसेच बस्ती गल्ली हालगा येथील महावीरनगर प्रवीण बेल्लद यांचे घर फोडून चांदीच्या वस्तु लांबविण्यात आल्या त्यानंतर महावीरनगर हालगा येथे भरत कल्लाप्पा गट्टद यांची घरासमोर पार्क केलेली डिस्कव्हर आणि स्प्लेंडर दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेल्या, तर त्यांचा भाऊ चंद्रकांत कल्लप्पा गट्टद यांचीही स्प्लेंडर चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकीतील पेट्रेल संपल्याने दोन किमी अंतरावर असलेल्या तलावाजवळ ती दुचाकी सोडून दिली आहे.

Advertisement

एकाच रात्री हालगा गावामध्ये या चोऱ्यांच्या घटनेमुळे एखादी मोठी टोळीच कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. या घटनेची नोंद बागेवाडी पोलीस स्थानकात झाली असून पोलीस पुढील तपास करत आहे.

Advertisement
Tags :

.