चोर, पोलिस, राजकारण्यांचे गुंडाराज
सुलेमान पलायन प्रकरणी विरोधकांचा घणाघात : बारा पोलिसांना निलंबित करून चौकशीची मागणी, सखोल चौकशीसाठी प्रकरण सीबीआयकडे द्यावे
पणजी : जमीन हडप प्रकरणातील मुख्य आरोपी सुलेमान उर्फ सिद्दीकी खान याला कोठडीतून पलायन करण्यास भाग पाडलेल्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिस अधिक्षकासह बारा पोलिसांना त्वरित गुन्हा अन्वेषण विभागातून हटवा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तसेच सुलेमानला अटक करून सुलेमानच्याबाबत खरे काय घडले, ते लोकांसमोर आणा अशीही मागणी विरोधकांनी केली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी चोर, पोलिस, राजकारण्यांचे गुंडाराज गोव्यात सुरु असल्याचा घणाघाती आरोप केला आहे. एकंदरीत या प्रकरणात चोर, पोलिसांच्या खेळात राजकारण्यांचीही ‘एंट्री’ आहेच, असा संशय जनतेत बळावला आहे. सुलेमान उर्फ सिद्दीकी खान याने तयार केलेला स्वत:चा व्हिडीओ हाती लागल्यानंतर आप आणि काँग्रेस हे विरोधी पक्ष आक्रमक झाले हेत. त्यांनी सोमवारी पोलिस महासंचालक (डीजीपी) अलोक कुमार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर सारा प्रकार मांडला. यावेळी काँग्रेसचे सुनिल कवठणकर, आपचे वाल्मिकी नायक, फ्रान्सिस कुयेल्हो, तुलिओ डिसोझा व अन्य नेते उपस्थित होते.
अमितचा काटा काढण्याचा डाव की काय?
जमीन हडप प्रकरणात पोलिसांसह भाजप नेत्यांचा सहभाग असल्याचा आमचा संशय आहे. त्यांची नावे उघड होऊ नये यासाठीच सुलेमानला कोठडीतून पळण्यास भाग पाडण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर त्याच्यासोबत असलेला आणि नंतर पोलिसांना शरण आलेला आयआरबीचा कॉन्स्टेबल अमित नाईक याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नसून, त्याचा काटा काढण्याचा पोलिसांचा डाव होता की काय? असा प्रश्न उपस्थित झाल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.
डीजीपीनी जबाबदारीने लक्ष घालावे
या अगोदरच आम्ही जमीन हडप प्रकरणात भाजप नेत्यांसह पोलिसही सहभागी असल्याचे सांगत होतो. मात्र आमच्या सांगण्याकडे कोणी लक्ष दिले नाही. सुलेमानने कोठडीतून बाहेर गेल्यानंतर प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमुळे आम्ही सांगितलेल्या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले आहे. आतातरी डीजीपीनी या प्रकरणात जबाबदारीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
प्रकरण त्वरित सीआयडीकडे द्यावे
सुलेमानने पाठविलेल्या व्हिडीओ क्लिप पाहिल्यास भाजपच्या नेत्यांनी गोवा लुटण्याचा घाट घातल्याचे दिसून येत आहे. अमित नाईक याचा काटा काढून हे प्रकरण कायमचे बंद करण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता असा संशय विरोधकांनी व्यक्त केला आहे. त्या बारा पोलिसांना सीआयडीमधून काढा आणि हे प्रकरण सीबीआयकडे द्या, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तसेच 12 डिसेंबर रोजीची सीआयडी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पहा, असेही विरोधकांनी सांगितले. एकंदरीत जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिद्दीकी सुलेमान खान याने कोठडीतून पोलिसाच्याच सहाय्याने पलायन केल्याने पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. ज्या कॉन्स्टेबलच्या मदतीने सुलेमान खान याने पळ काढला त्या अमित नाईकला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला की त्याला कुणीतरी मारण्याचा प्रयत्न केला, याबाबतही साशंकता व्यक्त होत आहे. त्याला गोमेकॉत दाखल केल्यानंतर त्याची प्रकृती सुधारल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
तक्रार सीबीआयकडे दिल्यास पोलिसांना शरण येतो
सुलेमान याने स्वत: तयार केलेल्या व्हिडीओत स्पष्ट म्हटले आहे की, आपण कोठडीतून पळून गेलेलो नाही, आपल्याला अधीक्षक, उपअधीक्षकासह बारा पोलिसांनी कोठडीतून पळून जाण्यास भाग पाडले आहे. या प्रकरणात उपसभापती जोशुआ यांच्यासह सीआयडी अधीक्षक राहूल गुप्ता, उपअधीक्षक सुरज हळर्णकर यांच्यासह इतर बारा पोलिसांचा हात आहे. आपल्या जीवाला धोका आहे. आपली तक्रार सीबीआयकडे दिल्यास आपण पोलिसांना शरण यायला तयार आहे.
सुलेमानकडून खळबळजनक आरोपांची मालिका
- सुलेमाननेआपल्याव्हिडीओत म्हटले आहे की 12 डिसेंबर रोजीचे सीआयडी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिल्यास सारा प्रकार उघडकीस येईल.
- यादिवशीरात्री 11 च्या सुमारास आपल्याला अधीक्षक राहूल गुप्ता यांच्यासमोर नेण्यात आले. तिथे आपल्याला भरपूर मारण्यात आले.
- म्हापशाची20 हजारचौरस मीटर जमीन जोशुआ सांगेल त्याच्या नावे कर अन्यथा तुझा एनकाऊन्टर करण्यात येईल, असे धमकावण्यात आले.
- त्यानंतरभल्यापहाटे पोलिसांचे एक पथक आपल्या अगोदर कर्नाटकात रवाना झाले.
- त्यानंतरआपल्यालाकोठडीतून बाहेर काढण्यात आले.
- आयआरबीकॉन्स्टेबलअमित नाईकसह दुचाकीवरून जाण्यास भाग पाडले.
- आम्हादोघांच्यामागून पाळोळेपर्यंत आणखी एक पोलिस पथक होते.
सुलेमान गुन्हेगार आहे, त्याचे दावे खूप संशयास्पद
- रायबंदरयेथीलगुन्हे अन्वेषण शाखेच्या (सीआयडी) कोठडीतून फरार झालेल्या सिद्दीकी उर्फ सुलेमान खान याला अटक करणे हेच आता पोलिसांचे प्राथमिक उद्दिष्ट आहे, असे पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी सांगितले.
- सुलेमानलाअटककेल्यानंतर त्याने व्हायरल केलेल्या व्हिडीओतील आरोपांची चौकशी केली जाईल.
- मात्रविरोधकांनीयाप्रकरणावरुन पोलिसांबाबत केलेल्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असेही ते म्हणाले.
- सुलेमानचामागकाढण्यासाठी गोवा पोलिसांच्या प्रयत्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी व्हिडिओद्वारे आरोप करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्याचा लवकर मागोवा घेण्याचे आमचे प्रयत्न सुरूच राहतील.
- हाव्हिडीओएका कठोर आणि हुशार गुन्हेगाराची युक्ती असल्याचे दिसते, असेही डीजीपी म्हणाले.
- आतापर्यंतच्यातपासातआयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईक वगळता इतर कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्याचे सुलेमान पळून जाण्यास संगनमत असल्याचे दिसून आलेले नाही.
- अमितनाईकलानोकरीतून बडतर्फ करण्यात आले आहे.
- याप्रकरणाबाबतकसून तपास सुरू आहे. आम्ही आरोपींना पुन्हा ताब्यात घेण्यासाठी सतत काम करत आहोत. डीआयजीच्या देखरेखीखाली अनेक टीम काम करत आहेत.
- आमच्याकडेनिश्चितसुगावा आहे आणि आम्ही सुलेमानला लवकरच अटक करु शकणार आहे, अशी आशा आहे.
- सुलेमानहाएक गुन्हेगार आहे. त्याने स्वत: गुन्हेगाराचा व्हिडिओ जारी केला आहे. तो पळून गेला आहे. जर त्याला विधान करायचे असेल, तर तो कोठडीत करू शकला असता. त्याचे दावे खूप संशयास्पद आहेत.
- सुलेमानयागुन्हेगाराने व्हिडीओ जारी केला आहे, याचा अर्थ असा नाही की तो जे काही बोलतो ते खरे आहे. आम्ही समोर आलेल्या तथ्यांवर आधारित कारवाई करत आहोत, असेही डीजीपी म्हणाले.