For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आझादनगर येथे चोरट्याला चोप

08:56 PM Nov 09, 2022 IST | Rohit Salunke
आझादनगर येथे चोरट्याला चोप

बेळगाव - मोबाईल चोरीसाठी घरात शिरलेल्या एका तरुणाला संतप्त जमावाने चोप दिला. मंगळवारी रात्री आझादनगर परिसरात हि घटना घडली असून त्याचा साथीदार फरारी झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. मंगळवारी रात्री दोन तरुण संशयास्पदरित्या फिरत होते. लहान मुलांच्या हातातील मोबाईल पळविण्याचा प्रकार घडला. मोबाईलसाठी हे तरुण दरवाजा उघडा असलेल्या घरात डोकावून पहात होते. लहान मुलांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन पलायन करताना नागरिकांनी पाठलाग केला. दोघा जणांपैकी एकट्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या साथीदाराने मात्र तेथून पळ काढला. संतप्त जमावाने त्याला चांगलाच चोप दिला. साथीदारा विषयी त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. नंतर त्या तरुणाला माळमारुती पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. यासंबंधी बुधवारी रात्री माळमारुती पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता पोलिसांनी माहिती देण्यास नकार दिला.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.