कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Solapur News : 'भटके कुत्रे झाले उदंड त्यांचा सोलापूरकरांना दंड'

04:47 PM Nov 30, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                              सोलापूरमध्ये भटके कुत्र्यांचा वाढला वावर 

Advertisement

by रणजित जोशी

Advertisement

सोलापूर : सोलापूर शहरात सध्या 'भटके कुत्रे झाले उदंड त्यांचा सोलापूरकरांना दंड' अशी अवस्था झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे कुत्र्यांना मारता येत नसले तरी नागरी वस्तीपासून दूर सोडणे गरजेचे आहे. विमानतळ परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर अद्यापही कायम आहे. काही वेळा ही कुत्री विमानतळाच्या रन-वेवर देखील दिसून आली आहेत. कुत्री भिंतीलगतच्या घरांवरून, स्वच्छतागृहांवरून उडी घेऊन विमानतळ परिसरात शिरतात. त्यांना पुन्हा सहजासहजी बाहेर पडता येत नसल्याने ती कुत्री आतील परिसरात बाबरतात. विमानतळाच्या सुरक्षेसाठी नेमलेले कर्मचारी अशा कुत्र्यांना बाहेर हाकलण्याचे काम करतात.

सोलापूर शहराची लोकसंख्या १२ लाखांपर्यंत आहे. एकूण लोकसंख्येच्या साडेचार टक्के भटकी कुत्री शहरातअसल्याचे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितले. या कुत्र्यांना पकडण्यासाठी सध्या महापालिकेकडे दोनच गाठ्या आहेत. त्यातही एक गाडी अत्यावश्यक कामासाठी आहे. शहरातील कुत्र्यांची संख्या २०२३ मध्ये ३६ ते ४० हजारांपर्यंत होती. दोन वर्षांत त्यात तीन ते चार हजारांची भर पडली आहे. तीन महिन्यांत विमानतळ परिसरातून ४० कुत्री पकडली. शहरात गेल्या काही वर्षात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली

तरी महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. सध्या शहराच्या गावठाण हद्द‌वाढ भागांत सुमारे ५० हजारांहून अधिक मोकाट कुत्र्यांचा वावर असल्याचे चित्र आहे.या मोकाट कुत्र्यांमुळे शहरवासीय असुरक्षित आहेत. आबालवृद्धांबर या मोकाट कुत्र्यांचा हल्ला होत आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी विविध संस्था, संघटना व पश्नांकडून वेळोवेळीमहापालिका प्रशासनाकडे करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाकडून कुत्रे निर्बिजीकरणाची प्रक्रिया ठेकेदाराबर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे प्रक्रियेकडे बोट दाखवत प्रशासन निवांतच आहे. मात्र, याचा फटका शहरातील आणि पर्यटनासाठी बाहेरून येणाऱ्या नागरिकांना बसत आहे.

महापालिका प्रशासनाने नेमलेल्या एका मक्तेदाराकडून केवळ दाखविण्यापुरतीच कार्यवाही आणि फोटोसेशन होत असल्याने लाखो रुपये खर्च करून निर्बिजीकरणाची प्रक्रिया राबवूनही शहरातील नागरिक मोकाट कुत्र्यांपासून सुरक्षित नसल्याची बाब पुढे आली आहे. निर्बिजीकरणाचा ठेका नव समाज निर्माण संस्थेला देण्यात आला आहे. प्रत्येक कुत्र्याच्या निर्ना बजीकरणामागे चांगली रक्कम त्यांना देण्यात येते. शिवाय यासाठी महापालिकेनेच पुणे रोडवरील जुना जकात नाका व इतर जागेत सर्वसोयीनियुक्त यंत्रणा मोफत उपलब्ध करून दिली आहे.

अशावेळी तक्रारीवर कार्यवाही होत नाही. मोजकेच निर्ना बजीकरण झाल्याचे दिसून येते. पण कुत्रे निर्बिजीकरण नोंदीचा घोळ कायम असल्याची चर्चा प्रभागातील लोकप्रतिनिधींकडूनच सुरू आहे. तर निर्ना बजीकरण केलेले मोकाट कुत्रे इतरत्र सोडण्याचे प्रकारही होत असल्याची ओरड आहे. निर्बिजीकरणासाठी हेल्पलाइन क्रमांक ७६६६५१३०२६ संपूर्ण शहरवासीयांसाठी देण्यात आली. मात्र या क्रमांकावर तक्रार दिल्यानंतरही कार्यवाही होत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया काही भागातील नागरिकांनी व्यक्त केली.

श्वान दंशाचे दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात तसेच महापालिकेच्या डफरीनसह विविध नागरी आरोग्य केंद्रात रेबीज लसीकरण व उपचारासाठी येत असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. मात्र, महापालिका प्रशासन शांतच असल्याची ओरड लोकप्रतिनिधींकडून सुरू झाली आहे. प्रशासनाच्या या गलथान कारभाराविरुद्ध आंदोलनासह शहरातील मोकाट कुत्रे पकडून महापालिकेत आणून सोडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaairport safetydog menacedog sterilizationmunicipal negligencepublic safetyrabies vaccinationStray dogs Solapur
Next Article