कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हे स्मार्ट फोन्स विक्री जास्त

06:33 AM Jul 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

भारतीय स्मार्टफोनची बाजारपेठ वर्षाच्या आधारावर 7 टक्के इतकी विकसित होत आहे. 39 दशलक्ष स्मार्ट फोन्स दुसऱ्या तिमाहीत भारतात दाखल झाले आहेत. भारतात विकल्या जाणाऱ्या आघाडीवरच्या विविध कंपन्यांच्या स्मार्ट फोन्सवर एक नजर टाकूया.

Advertisement

स्मार्टफोन्सची बाजारपेठ अधिक विस्तारलेली असून सॅमसंग, विवोसह ओप्पो यासारख्या ब्रँडच्या फोन्सचा सध्या बोलबाला पाहायला मिळतो आहे. शाओमी ही एकेकाळी मोबाइल फोन्समध्ये भारतात गतीने विकसित होणारी कंपनी होती. पण आता ती 5जी व एआयच्या युगात स्पर्धेत मागे पडलेली दिसते आहे.  अग्रस्थानावर सध्याला विवो ही कंपनी असून त्यापाठोपाठ सॅमसंग आहे.

  1. विवो-विवो या कंपनीने बाजारात 21 टक्के हिस्सेदारी काबीज केली आहे. या कंपनीने 8.1 दशलक्ष स्मार्टफोन्स दुसऱ्या तिमाहीत भारतात पाठवले आहेत. व्ही 50 सिरीजचे फोन्स सर्वाधिक मागणीत आहेत तर छोट्या शहरात वाय सिरीजचा दबदबा पहायला मिळतो आहे.
  2. सॅमसंग- भारतीय बाजारात यांचे 6.2 दशलक्ष स्मार्टफोन्स दाखल झाले असून 16 टक्के हिस्सेदारीसह विक्रीत दुसरा नंबर या कंपनीचा आहे. ए-36 व ए-56 मॉडेल्स लोकप्रिय आहेत. इएमआय योजनेमुळे यांचा खप अधिक आहे.
  3. ओप्पो- शाओमीवर मात करत या कंपनीने तिसरे स्थान हिस्सेदारीत पटकावले आहे. कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 5 दशलक्ष स्मार्टफोन्स भारतात पाठवले आहेत. ए-5 हा स्मार्टफोन मागणीत असून के-13 स्मार्ट फोनही विक्रीत चांगली कामगिरी करतोय.
  4. शाओमी- चौथ्या नंबरवर असणाऱ्या या कंपनीने अंदाजे 5 दशलक्ष स्मार्ट फोन्स भारतात पाठवले आहेत. वर्षाच्या आधारावर विक्रीत काहीशी नरमाई आहे. 14 सी 5जी व ए-5 यासोबत नोट-14 मॉडेलही त्याच्या डिझाइनमुळे लोकप्रिय झाला आहे.

5.अॅपल- शिपमेंटमध्ये अॅपलला आयफोन-16 ने चांगला सहारा दिलाय.  आयफोन 16 ची शिपमेंट 55 टक्के भारतात झाली आहे. 16 इ आयफोनबाबत मात्र ग्राहकात नाराजी असल्याचे सांगितले जाते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article