नॅशनल हेराल्ड प्रकरणात शिवकुमारांच्या निकटवर्तीयाला नोटीस
11:42 AM Dec 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : नॅशनल हेराल्ड प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेस नेते इनायत अली यांना नोटीस बजावली आहे. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र प्रकरणात ईडीच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एफआयआर दाखल केला होता. 3 ऑक्टोबर रोजी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविऊद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनाही नोटीस बजावण्यात आली होती. सध्या दिल्ली पोलिसांनी डी. के. शिवकुमार यांचे निकटवर्तीय इनायत अली यांनाही चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. दिल्ली पोलिसांनी अली यांच्या मंगळूर येथील घरी येऊन एका आठवड्यात हजर राहण्याची नोटीस बजावली.
Advertisement
Advertisement