For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रामसभांच्या विषयावर विधानपरिषदेत आरोप-प्रत्यारोप

12:20 PM Dec 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
ग्रामसभांच्या विषयावर विधानपरिषदेत आरोप प्रत्यारोप
Advertisement

बेळगाव : राज्यात अनुसूचित जाती-जमातींसाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. यासाठी अनुदानाचीही तरतूद करण्यात आली होती. राज्यात अनुसूचित जाती-जमातींसाठी 900 ग्रामसभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पंचायतराज खात्याकडून 432 ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत. काही ग्रामसभा झाल्या नसल्या तरी पुढील दिवसात पुन्हा विशेष ग्रामसभांचे आयोजन केले जाईल, अशी माहिती ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री प्रियांक खर्गे यांच्यावतीने कामगारमंत्री संतोष लाड यांनी दिली.

Advertisement

पंचायत व्यवस्था ढासळल्याचे चित्र सध्या राज्यात दिसून येत आहे. अनुसूचित जाती-जमातींसाठी विशेष ग्रामसभांची तरतूद करण्यात आली असली तरी राज्य सरकारकडून तसे होताना दिसत नाही. राज्य सरकारने ग्रामसभा का घेतल्या नाहीत? यासाठी मंजूर केलेला निधी कोठे खर्ची घातला?, असे प्रश्न विधानपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य विधानपरिषद सदस्य एफ. एच. जक्कण्णवर यांनी उपस्थित केले. याला विरोधी पक्षातील सदस्यांनी पाठिंबा देत सरकारकडे बोट केले.

जक्कण्णवर यांच्या प्रश्नाला समर्थन देणाऱ्या विरोधी पक्षाला प्रत्युत्तर देताना सभागृह नेते एन. एस. बोसराजू यांनी, जक्कण्णवर हे तुम्हाला हवे आहे तसे प्रश्न विचारत आहेत. यामुळे तुम्हाला आनंद होत आहे, असा चिमटा काढला. यामुळे सभागृहात हशा पिकला. काही वेळानंतर याच प्रश्नावर सत्ताधारी व विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. परिणामी सभागृहात गोंधळ निर्माण झाला.  परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी सभापती बसवराज होरट्टी यांनी दोन्ही बाजूच्या सदस्यांना आपापल्या आसनावर बसण्यास सांगितले. तसेच सदस्याने प्रश्न विचारला आहे,

Advertisement

त्यांना विरोधकांनी भडकवू, अशी समज दिली. याच दरम्यान, विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी यांनी राज्य सरकारवर आरोप करताना ग्रामसभांसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, हा निधी खर्च झाला आहे की राखून ठेवला आह,s याची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी केली. तसेच यामध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी केली. चर्चेदरम्यान काँग्रेसचे सदस्य सलीम अहमद यांनी सदर विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष अर्धा तासाची तरतूद करावी, अशी मागणी सभापतींकडे केली. त्यानुसार सभापती बसवराज होरट्टी यांनी मुभा देऊ, असे आश्वासन दिले. त्यानंतर सभागृहातील गोंधळ दूर झाला.

Advertisement
Tags :

.