गंभीर अपघात होता...होता वाचला, भिंतीवर जाऊन गाडी धडकली...!
सांगली :
सांगलीहून मिरजेकडे निघालेल्या एका चारचाकीचालकाची शुगर कमी झाल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे चारचाकी रस्ता दुभाजक ओलांडून विरुध्द दिशेला असलेल्या एका घराच्या भिंतीवर आदळली. उपस्थितांनी तातडीने चालकास वाहनातून बाहेर काढून ऊग्णालयात दाखल केले. सुदैवाने अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. हा अपघात सायंकाळी 6 च्या सुमारास घडला.
घटनेची माहिती अशी,मिरजेहून सांगलीकडे जाण्राया एका चारचाकीचालकास थोडे अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने राम मंदिर चौकातून वळण घेवून चर्च नजीक असण्राया दवाखान्यात जाण्यासाठी निघाला होता. मात्र थोडे अंतर गेल्यावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि चारचाकी रस्ता दुभाजक ओलांडून विरुध्द दिशेला असलेल्या एका घराला असलेल्या कंपाउंडला धडकली.
सुदैवाने पुष्पराज चौकात सांगलीच्या दिशेने जाण्यासाठी असलेला ा†सल लागलेला असल्याने सर्व वाहने चौकातच थांबली होती. त्यामुळे रस्त्यावर वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. चारचाकी भिंतीवर धडकल्याने कंपाऊंड तुटले. यावेळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक धावत घटनास्थळी आले. त्यांनी तातडीने चालकास गाडीतून बाहेर काढले. त्याला कोठेही मार लागलेला नव्हता. नागरिकांनी चालकास ऊग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिक्रायांनी उपचार केल्याने एका तासात रुग्णाची तब्येत पूर्ववत झाली.