For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालपे-नईबाग येथे संरक्षकभिंतीवर दरड कोसळली

08:04 AM Jun 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
मालपे नईबाग येथे संरक्षकभिंतीवर दरड कोसळली
Advertisement

सुदैवाने दुर्घटना टळली, गोव्यात येणारे पर्यटक कुटुंब बचावले, वाहतुकीसाठी एकेरी मार्ग बंद

Advertisement

पेडणे  /(प्रतिनिधी )

राष्ट्रीय महामार्ग 66 वर मालपे-नईबाग येथे महामार्ग शेजारी बांधलेल्या काँक्रिटच्या संरक्षकभिंतीवर दरड कोसळल्याने संरक्षकभिंतीचा काँक्रिटचा भाग रस्त्यावर पडला. त्याच दरम्यान पालघर महाराष्ट्र येथून गोवामार्गे पणजीच्या दिशेने जात असलेल्या मारुती क्रमांक जी. जे.03 जे एल 0551  गाडीवर काही दगड पडले, मात्र चालकाने गाडी थांबवल्याने संभाव्य धोका टळला. गाडीतील प्रवासी सुखरूप बचावले. मात्र गाडीच्या दर्शनी भागाची हानी झाली आणि अनर्थ टळला. तरुण भारतने याबाबत एक महिन्यापूर्वी वृत्त प्रसिद्ध करून ही दरड  कोसळणार असे वृत्त प्रसिद्ध केले होते आणि अखेर हे भाकीत खरे ठरले.

Advertisement

पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी या भागाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली होती. राष्ट्रीय महामार्ग विभाग कोलवाळ   संबंधित अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देत तसेच सर्व राष्ट्रीय महामार्ग विभाग कोलवाळ कार्यालयाच्या विभाग अभियंते तसेच कंत्राटदारांचे अभियंते यांनाही याबाबत सूचना आणि ताकीद दिली होती की सदर भिंत कोसळणार मात्र यावेळी संबंधित अभियंत्याने ही भिंत कोसळणार नाही, याबाबत शंभर टक्के आम्ही गॅरंटी देतोय ही भिंत कोसळणार नसल्याचे आमदारांनी सांगितले .मात्र पहिल्याच पावसाळ्यात जून महिना अजून संपला नाही आणि ही दरड कोसळून संरक्षकभिंत पडली. यामुळे राष्ट्रीय महामार्गाचा एकेरी मार्ग सकाळपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला.

वाहतूक पूर्वीच्या जुन्या रस्त्याने वळवा: आमदार प्रवीण आर्लेकर

दरम्यान, शनिवारी दुपारी पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी या दरड कोसळलेल्या जागेची पाहणी करून संबंधित अधिकारी रस्ता विभागाचे दामोदर तारे तसेच कार्यकारी अभियंते यांना सक्त ताकीद देत ही संरक्षकभिंत जोपर्यंत चांगली बांधून  होत नाही तोपर्यंत ही वाहतूक पूर्वीच्या जुन्या मार्गाने वळवण्याच्या सूचना आमदार प्रवीण आर्लेकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या .

रस्ता विभाग खाते बंद करा : सरपंच महाले

यावेळी बोलताना तांबोसे -मोप -उगवेचे सरपंच सुबोध महाले यांनी यावेळी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. वारंवार सूचना करूनही  हा प्रकार घडल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.  आमच्या भागातील रस्ता तसेच राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे या अधिकाऱ्याने केलेले आहे. याला कंत्राटदारच जबाबदार असून मात्र कंत्राटदाराला हे अधिकारी पाठीशी घालत आहेत. सरकार आणि रस्ता विभाग वाहतूक खात्याच्या अभियंत्यावर आणि तांत्रिक गोष्टी पाहण्यासाठी लाखो ऊपये खर्च सरकार करतो मग त्याचा उपयोग काय? जर ते काम व्यवस्थित करत  नाही तर अशा अधिकाऱ्यांवर सरकारने का खर्च करावा त्यापेक्षा ते खातेच बंद सरकारने करावे. साबांखा मंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यात विशेष लक्ष घालून या भागाची पाहणी करून हा रस्ता तातडीने दुऊस्ती करण्याची मागणी सरपंच सुबोध महाले यांनी केली .

एमव्हीआर रस्ता बांधकाम कंपनी सरकारचा जावई: वीरेंद्र शिरोडकर

यावेळी काँग्रेस उत्तर गोवा अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर यांनी या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर गोवा सरचिटणीस जितेंद्र गावकर, पेडणे मतदारसंघ काँग्रेस गट अध्यक्ष कृष्णा नाईक, सामाजिक कार्यकर्ते उदय महाले यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना उत्तर गोवा अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर म्हणाले की, एम .व्ही .आर रस्ता बांधकाम कंपनी ही सरकारचा जावई आहे. त्यामुळे सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. अनेकवेळा या भागात अपघात झाले. अनेकांचे या अपघातात मृत्यू झाले. रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम या एम. व्ही आर   कंत्राटदाराने केलेले आहे, मात्र सरकारचे अभियंते त्यांना पाठीशी घालत आहेत. या भागाचे आमदार यांनी याकडे लक्ष देऊन त्यांना याबाबत जाब विचारावा तसेच हे काम चांगल्या पद्धतीने करून घेणे गरजेचे आहे. दरड कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी या रस्त्याने हजारो वाहने पर्यटक तसेच अन्य वाहने दिवसाला ये-जा करत आहेत. यासाठी सरकारने तातडीने यावर पाऊले उचलावीत, अशी मागणी वीरेंद्र शिरोडकर यांनी केली .

संबंधित अधिकारी, कंत्राटदारावर कारवाई करा: अॅड. जितेंद्र गावकर

यावेळी बोलताना उत्तर गोवा काँग्रेस सरचिटणीस अॅङ जितेंद्र गावकर म्हणाले की गेली अनेक वर्षे या भागातून रस्ता काम सुरू असतानाही अनेकांचे बळी या रस्त्यासाठी गेलेले आहेत. आज  दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना होण्याची टळली असली तरी भविष्यात या ठिकाणी परत मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. वारंवार आम्ही आवाज उठवला मात्र सरकारला जाग येत नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गोवा राज्याचे मुख्यमंत्री यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.  या भागाची मुख्यमंत्र्यांनी त्वरित पाहणी करून या अधिकाऱ्यांना तसेच कंत्राटदाराला आदेश द्यावेत नाहीतर या ठिकाणी मोठी दुर्घटना होणार असून त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार आणि हे अभियंते राहणार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांवर सरकारने कारवाई करत असताना त्याला बडतर्फ करावे तसेच संबंधित कंत्राटदार आहे त्याला काळ्यायादीत  त्याचा समावेश करावा नाहीतर आम्ही सोमवारी त्याच्या विरोधात पेडणे पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करणार असल्याचे यावेळी अॅङ जितेंद्र गावकर यांनी सांगितले .    यावेळी सामाजिक कार्यकर्ते उमेश तळवणेकर, प्रेमानंद हळदणकर, तेली आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.