माणसांचा मेंदू खाणारा होता समुदाय
वैज्ञानिकांनी शोधले शीररहित सांगाडे
तुम्ही अनेक नरभक्षकांच्या कहाण्या ऐकल्या असतील, जे माणसांना मारून टाकल्यावर त्यांना खात होते, परंतु एखादा माणूस कुणाला मारून त्याचा मेंदू खाऊ शकतो का या प्रश्नाचे उत्तर होय आहे. लोकांनी शत्रूला ठार केल्यावर त्याचा मेंदू बाहेर काढत खाल्ला आहे. वैज्ञानिकांनुसार सुमारे 18 हजार वर्षांपूर्वी म्हणजेच हिमयुगात युरोपमध्ये राहणारे काही लोक असे करत होते. अलिकडेच वैज्ञानिकांनी शीररहित सांगाडे शोधले आहेत.
पोलडच्या मस्जिका गुहेत मॅग्डालेनियन नावाच्या समुहाने स्वत:च्या मृत शत्रूंच्या मेंदूंचे सेवन केले होते, असे सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये प्रकाशित अहवालात म्हटले गेले आहे. संशोधकांनी मॅग्डालेनियन संस्कृतीच्या किमान 10 लोकांच्या हाडांची तपासणी केली, हे लोक 11-17 हजार वर्षांपूर्वी युरोपमध्ये राहत होते. इमेजिंग टेक्निकचा वापर करत फ्रान्स, स्पेन आणि पोलंडच्या संशोधकांच्या टीमने अशा खुणा आणि कट्सची ओळख पटविली, जे कवटीतून मेंदू बाहेर काढण्याशी निगडित होते. मॅग्डालेनियन लोकांमध्ये नरभक्षण तुलनेत सामान्य होते, असे अनेक अध्ययनातून स्पष्ट झाले आहे.
वैज्ञानिकांच्या एका टीमने हाडं आणि प्राण्यांच्या अवशेषांचे अध्ययन केले, यातील 10 जणांमध्ये 6 प्रौढ तर 4 मुलांचा समावेश होता. त्यांच्या अवशेषांमध्ये कट आणि तुटल्याच्या खुणा होत्या. संशोधनादरम्यान या स्कॅल्टनवर कवटीची त्वचा हटविणे आणि कान कापण्याचे संकेतही मिळाले आहेत. या संशोधनातून तेथील लोकांनी बाहेरील लोकांना ठार केल्यावर त्यांचे मृतदेह कापले आणि त्याचा वापर केल्याचे कळते. तर काही सांगाडे सन्मानासह दफन करण्यात आले होते.
हाडांनी अवजारांची निर्मिती
मॅग्डालेनियन्सविषयी माहिती फारच कमी उपलब्ध आहे, परंतु दशकांपासून यावर अध्ययन सुरू आहे. यातून त्यांच्या परंपरांमध्ये अंत्यसंस्कार देखील सामील असल्याचे कळते. परंतु मृतदेहांमधून मांस काढत वेगळे करणे आणि हाडांचा वापर अवजारांसाठी करणे देखील त्यांच्या परंपरेत सामील होते. येथील लोकांनी कवटीचा वापर कप तयार करणे, दागिने तयार करणे आणि कच्चा माल म्हणूनही वापर केल्याचे काही अध्ययनात समोर आले.
का सुरू झाले नरभक्षण?
काही नमुन्यांमधून त्वचा आणि मांस हटवून त्याद्वारे सजावटी सामग्री तयार करण्यात आल्याचा निष्कर्ष वैज्ञानिकांनी काढला आहे. हिमयुगानंतर लोकसंख्या वाढविण्यासाठी साधनसामग्री जमविण्यावर काम सुरू करण्यात आले होते. याचमुळे युद्ध आणि माणसांना खाण्याच्या प्रक्रियेला बळ मिळाल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे.