महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बीबीए-बीसीए पदवी अभ्यासक्रमासाठी वेगवेगळा अभ्यासक्रम असावा

10:30 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हिंदी प्राध्यापक संघातर्फे कुलगुरुंना निवेदन

Advertisement

बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या बीबीए व बीसीए या दोन्ही पदवी अभ्यासक्रमासाठी वेगवेगळा अभ्यासक्रम असावा, अशा मागणीचे निवेदन हिंदी प्राध्यापक संघातर्फे कुलगुरु प्रा. सी. एम. त्यागराजन यांना देण्यात आले. सदर विद्यापीठामध्ये यावर्षीपासून एनईपी म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अभ्यासक्रम रद्द करून एसईपी म्हणजे राज्य शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सर्व विषयांचा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सुरू आहे. राज्यातील इतर सर्व विद्यापीठात बीए, बीकॉम, बीएस्सी, बीबीए व बीसीए या पाच पदवी कोर्ससाठी सर्व भाषांचे पाच वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. परंतु, राणी चन्नम्मा विद्यापीठाने फक्त चार अभ्यासक्रम ठेवले असून हिंदी तसेच इतर सर्व भाषांचा बीबीए व बीसीए पदवीकरिता एकच अभ्यासक्रम ठेवावा. त्यामुळे एकूण पाच वेगवेगळे अभ्यासक्रम होतील, असे निवेदन हिंदी प्राध्यापक संघातर्फे माजी अध्यक्ष व विद्यापीठाचे हिंदी अभ्यास मंडळ सदस्य प्रा. विजयकुमार पाटील यांनी दिले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article