For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रेन रॉटची होतेय चर्चा

06:42 AM Dec 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
ब्रेन रॉटची होतेय चर्चा
Advertisement

रिल्स पाहण्याची सवय सडवतेय तुमचा मेंदू

Advertisement

अनेक लोक हे इन्स्टाग्राम रिल्स किंवा शॉर्ट व्हिडिओ पाहून अनेक तास वाया घालवत असतात आणि याची त्यांना जाणीवही नसते. बहुतांश रिल्समधील कंटेंटला कुठलाही खास अर्थ नसतो. रील्स, शॉर्ट व्हिडिओ सातत्याने पाहण्याच्या अशा सवयीला काय म्हटले जाते याचा कधी विचार केला आहे का?

ऑक्सफोर्ड विद्यापीठाने या सवयीला व्यक्त करणाऱ्या शब्दाला 2024 चा वर्ड ऑफ द ईयर म्हणून निवडले आहे. याला ब्रेन रॉट म्हटले जाते. हा शब्द सोशल मीडियावर बेकार कंटेंट पाहिल्याने मेंदूवर पडणाऱ्या नकारात्मक प्रभावाला दर्शवितो. 2023-24 दरम्यान या शब्दाच्या वापरात 230 टक्क्यांची वृद्धी झाली आहे.

Advertisement

ब्रेन रॉट का झाला लोकप्रिय

ऑक्सफोर्ड लँग्वेजेसचे अध्यक्ष कॅस्पर ग्राथवोहल यांच्यानुसार हा शब्द वर्च्युअल लाइफच्या धोक्यांना जाहीर करतो, नवे तंत्रज्ञान आणि मानवतेदरम्यान संवादाचे प्रतीक आहे. याला वर्ड ऑफ द ईअर म्हणून स्वीकार करणे वर्तमान काळातील योग्य चित्र सादर करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कुठून आला शब्द

ब्रेन रॉटचा वापर इंटरनेट येण्यापूर्वी 1854 मध्ये हेन्री डेव्हिड थॉरो यांनी स्वत:चे पुस्तक वाल्डेनमध्ये केला होता. त्यांनी जटिल विचारांना कमी महत्त्व देणाऱ्या समाजाच्या प्रवृत्तीवर प्रश्न उपस्थित केला होता. इंग्लंड बटाटे सडण्यापासून वाचविण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ब्रेन रॉट दूर करण्याचा प्रयत्न का करत नाही असे त्यांनी लिहिले होते.

जेन जी अन् जेन अल्फामध्ये लोकप्रिय

हा शब्द सर्वात प्रथम सोशल मीडियावर जेन जी (1997-2012 मध्ये जन्मलेले) आणि जेन अल्फा (2013 नंतर जन्म) दरम्यान प्रचलित झाला. जेन जी इंटरनेटसोबत वाढले आहेत, तर जेन अल्फा पूर्णपणे डिजिटल वातावरणात विकसित होत आहे, या पिढ्यांदरम्यान सोशल मीडिया आणि डिजिटल सवयींना दाट प्रभाव दिसून येतो.

Advertisement
Tags :

.