For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेत चित्रपटांवरही आता 100 टक्के ‘टॅरिफ’

06:22 AM Sep 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेत चित्रपटांवरही  आता 100 टक्के ‘टॅरिफ’
Advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांचा चित्रपट क्षेत्राला दणका : भारतावरही परिणाम

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी संपूर्ण जगाला आणखी एक मोठा धक्का दिला. त्यांनी अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या चित्रपटांवर 100 टक्के टॅरिफची घोषणा केली. हे 100 टक्के व्यापार शुल्क भारतात तयार होणाऱ्या चित्रपटांवरही लागू होणार असल्यामुळे हा भारतीय चित्रपट उद्योगासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ट्रम्प यांच्या नवीन घोषणेमुळे अमेरिकेत प्रदर्शित होणाऱ्या भारतीय चित्रपटांचे नुकसान होऊ शकते.

Advertisement

गेल्या काही वर्षांत अमेरिकेत भारतीय चित्रपटांचा व्यवसाय अंदाजे 2 कोटी डॉलर्सपर्यंत (जवळपास 170 कोटी रुपये) पोहोचला आहे. 100 टक्के टॅरिफ लादल्यामुळे भारतीय चित्रपटांच्या महसुलातही लक्षणीय घट होईल. कोविड-19 साथीच्या आजारापूर्वी अमेरिकेतील भारतीय चित्रपट बाजारपेठ केवळ 8 कोटी डॉलर्सची होती. कोरोना संसर्ग संपल्यानंतर ती झपाट्याने वाढून जवळजवळ 20 कोटी डॉलर्सपर्यंत वाढली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये नव्या टॅरिफची घोषणा केली आहे.

ट्रम्प यांनी दीर्घकालीन समस्येचे निराकरण करण्यासाठी सर्व परदेशी चित्रपटांवर 100 टक्के कर लादला आहे. हे पाऊल प्रामुख्याने अमेरिकन बाजारपेठेत हॉलिवूड चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. परंतु हे धोरण भारतीय चित्रपटांवर देखील परिणाम करते कारण ते सर्व परदेशी निर्मितींना लक्ष्य करते.

भारतीय चित्रपटांसाठी अमेरिका सर्वात महत्वाच्या परदेशी बाजारपेठांपैकी एक आहे. उद्योग सूत्रांनुसार, भारतीय चित्रपटांच्या एकूण आंतरराष्ट्रीय कमाईच्या अंदाजे 30 ते 40 टक्के अमेरिकन बॉक्स ऑफिसचा वाटा आहे. तेलुगू चित्रपटांसाठी ते तेलंगणानंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय ठिकाण आहे. मोठ्या बजेटचे तेलुगू चित्रपट त्यांच्या बॉक्स ऑफिस कमाईच्या 25 टक्केपर्यंत उत्पन्न अमेरिकन बाजारपेठेतून मिळवत असतात. हे चित्रपट सामान्यत: 700-800 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतात.

Advertisement
Tags :

.