महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निखिल गुप्ताला दिलासा नाही, न्यायालयाने फेटाळली याचिका

07:00 AM Jan 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : अमेरिकत खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येच्या कथित कटात सामील असल्याचा आरोप असलेले भारतीय नागरिक निखिल गुप्ता यांनी गुरुवारी मोठा झटका बसला आहे. निखिल यांच्या कुटुंबीयांकडून दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. पन्नूच्या हत्येच्या कटाचे आरोपी निखिल गुप्ता यांना कौन्स्युलर अॅक्सस देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. हा संवेदनशील मुद्दा आहे आणि हे प्रकरण विदेशी न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. पन्नूच्या हत्येच्या कटाप्रकरणी निखिल गुप्ताचे नाव समोर आल्यावर भारतीय विदेश मंत्रालयाने भूमिका मांडली होती. या पूर्ण प्रकरणाची चौकशी एक उच्चस्तरीय समिती करणार आहे. समितीच्या अहवालाच्या आधारावर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सरकारने म्हटले होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article