महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

युपीएससी, एसएससीच्या परीक्षांमध्ये पेपरलीक नाही

07:00 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केंद्र सरकारने संसदेत दिली माहिती

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

मागील दोन वर्षांमध्ये युपीएससी, एसएससी, रेल्वे भरती बोर्ड आणि बँकिंग कर्मचारी निवड संस्थेकडून आयोजित भरती परीक्षांमध्ये पेपरलीकची एकही घटना घडली नसल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी राज्यसभेत सांगितले. अलिकडेच नॅशनल टेस्टिंग एजेन्सीने 5 मे रोजी ओएमआर मोडमध्ये नोट (यूजी)चे आयोजन केले होते. कथित अनियमितता/फसवणूक/गैरवर्तनाच्या काही घटना उघडकीस आल्या होत्या. समीक्षेनंतर विस्तृत चौकशीसाठी हे प्रकरण 22 जून रोजी सीबीआयकडे सोपविण्यात आल्याचे केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लेखी उत्तरादाखल सांगितले आहे.

लोक परीक्षांमध्ये चुकीच्या साधनांचा वापर रोखण्यासाठी सरकारने लोक परीक्षा अधिनियम, 2024 लागू केला आहे. तसेच या कायद्याचे नियम देखील अधिसूचित करण्यात आले आहेत. मागील 6 आर्थिक वर्षांमध्ये 35 टक्क्यांपेक्षा अधिक वृद्धीसह देशात रोजगार 64.33 कोटी झाले आहेत. 2017-18 मध्ये हे प्रमाण 47.5 कोटी इतके होते असे सरकारकडून सांगण्यात आले. 2017-18 ते 2023-24 पर्यंत रोजगारात एकूण वाढ जवळपास 16.83 कोटी इतकी झाली. उत्पादन क्षेत्रात 2017-18 पासून 2022-23 पर्यंत रोजगाराच्या 85 लाख संधी निर्माण झाल्याचे कामगार तसेच रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी राज्यसभेत सांगितले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article