महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘सबका साथ, सबका विकास’ची नाही गरज

06:48 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजप नेते अधिकारी यांचे वक्तव्य : जे आमच्यासोबत, आम्ही त्यांच्यासोबत

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेत आणि भाजप नेते शुभेंदु अधिकारी यांनी बुधवारी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. भाजप नेते ‘सबका साथ, सबका विकास’ असे म्हणतात, परंतु आता आम्ही हे म्हणणार नाही. आता आम्ही ‘जे आमच्यासोबत, आम्ही त्यांच्यासोबत’ असे म्हणणार आहोत. ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणणे बंद करा, अल्पसंख्याक मोर्चाची कुठलीच गरज नसल्याचे अधिकारी यांनी म्हटले आहे.

आम्ही हिंदू असल्याने आम्हाला निवडणुकीत मतदान करू दिले जाणार नाही. जिहादी सकाळपासून माझ्या घरासमोर बसून राहतील. पोलीस प्रेक्षक गॅलरीत जातील. आम्हाला आताच जागे व्हावे लागणार आहे. मी आता सायन्स सिटीमध्ये आहे, येथून 10 किलोमीटर अंतरावर घटकपूर आणि भांगरमध्ये चार हिंदुबहुल भाग आहेत. दोन्ही क्षेत्रांमधील हिंदूंना मतदान करण्याची अनुमती नव्हती. बदुरिया, हरोआ, कॅनिंग वेस्टमध्ये विरोधक दीड लाख मतांनी जिंकले, बसंती एक्स्प्रेस-वे इस्लामाबाद झाला आहे. मतदार ओळखपत्राद्वारे मतदान होत नव्हते. एका कागदाद्वारे मतदान व्हायचे. आम्हाला बंगालमध्ये लोकशाही हवी आहे. धानेखाली, केशपूर, इंदास, पत्रसायर, शितलाकुचीमध्ये हिंदूंना मतदान करण्याची अनुमती नव्हती. निवडणुकीच्या दिवशी गुंडांना स्थानबद्ध केले जावे अशी माझी इच्छा आहे. केंद्रीय सुरक्षा दलांना मतदार ओळखपत्र पडताळून पाहण्याचा अधिकार दिला जावा अशी आमची मागणी आहे. राज्यपालांची भेट घेतली, राष्ट्रपतींना ईमेल केला, पश्चिम बंगालमध्ये राज्यघटनेचे अस्तित्व संपले आहे. आम्ही राज्यघटना वाचवू पाहत आहोत. संघटनात्मक कमजोरी, नेतृत्व संकट आणि त्यानंतर मतांची लूट सुरू असल्याचा आरोप अधिकारी यांनी केला.

शुभेंदु यांच्या या वक्तव्याद्वारे आता भाजप बंगालमध्ये हिंदू मतदारांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचा संदेश स्पष्ट झाला आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांनी एकजूट होत तृणमूल काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. तर हिंदू मतदारांमध्ये विभागणी झाली, अशा स्थितीत आता व्यूहनीति बदलावी लागणार असल्याचे भाजपचे मानणे आहे.

बंगालमध्ये तृणमूलला पाठिंबा

पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांना तृणमूल काँग्रेसचा समर्थक मानले जाते. डावे पक्ष आणि काँग्रेस देखील याच मतपेढीवर नजर ठेवून आहे. भाजपने देखील या समुदायामध्ये स्वत:चा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु यात फारसे यश आलेले नाही. 2018 च्या बंगाल पंचायत निवडणुकीत मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने मुस्लीम संमेलने आयोजित केली होती. तसेच भजपने 850 हून अधिक मुस्लिमांना उमेदवारीही दिली होती. यातील 27 जणांना विजय मिळाला होता. बंगालमध्ये सुमारे 30 टक्के मतदार हे मुस्लीम आहेत, राज्यातील 294 जागांपैकी सुमारे 100 ठिकाणी हे मतदार निर्णायक भूमिकेत आहेत. 2010 पासून बंगालमध्ये मुस्लीम मतपेढीवर तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व असल्याचे चित्र आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article