महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मिर्झापूरमध्ये कुणीच कालीन भैया नाही : अनुप्रिया पटेल

06:32 AM Jul 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

मिर्झापूरध्ये कुणीच कालीनभैया नाही, मिर्झापूर अत्यंत शांत आणि सुंदर शहर आहे. या शहरात केवळ सुंदर गालिचे आहेत अशी टिप्पणी केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी मंगळवारी केली आहे. अपना दलाच्या प्रमपुख अनुप्रिया पटेल या उत्तरप्रदेशच्या मिर्झापूरच्या खासदार आहेत.

Advertisement

मिर्झापूरमध्ये शांतता नांदत आहे. तेथे वेबसीरिजप्रमाणे कुणीच कालीनभैया नसल्याचे अनुप्रिया यांनी म्हटले आहे. आमचा पक्ष जातनिहाय जनगणनेच्या बाजूने आहे. जातनिहाय जनगणनेमुळे प्रत्येक जात आणि समुदायाच्या संख्येविषयी माहिती कळू शकणार आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान आरक्षण हटविण्याची आणि राज्यघटना बदलाच्या अफवेमुळे भाजप आणि त्याच्या घटक पक्षांना उत्तरप्रदेशात फटका बसला आहे. विरोधी पक्षांनी या अफवेचा आधार घेतला, याला प्रत्युत्तर देण्यास विलंब झाल्याचे अनुप्रिया यांनी म्हटले आहे.

राज्यात योगी आदित्यनाथ यांचे सरकार असून केशवप्रसाद मौर्य हे उपमुख्यमंत्री आहेत. मौर्य हे यापूर्वीही दिल्लीत येत राहिले आहेत आणि पंतप्रधान मोदींसमवेत अनेक वरिष्ठ नेत्यांशी त्यांच्या भेटीगाठी होत असतात. यात काहीच वेगळे नाही. याप्रकरणी होत असलेल्या चर्चा पूर्णपणे चुकीच्या असल्याचा दावा अनुप्रिया पटेल यांनी केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article