‘व्याघ्र क्षेत्र’ आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी नाहीच
पणजी : म्हादई अभयारण्य व्याघ्र क्षेत्र करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशास आव्हान देणारी गोवा सरकारची विशेष याचिका (एसएलपी) सर्वोच्च न्यायालयात काल शुक्रवारी सुनावणीस येणार होती, पण ती सुनावणीस आलीच नाही. याप्रकरणी गोवा खंडपीठात सादर करण्यात आलेल्या अवमान याचिकेवरील सुनावणी काल सुनावणीस येणार असलेल्या याचिकेवर अवलंबून होती आणि त्याच कारणासाठी खंडपीठातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता दोन्ही न्यायालयातील सुनावण्या होणार की नाही? आणि त्यातून काय साध्य होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या काल शुक्रवारच्या यादीत गोवा सरकारच्या आव्हान याचिकेचा समावेश नव्हता, त्यामुळे व्याघ्रक्षेत्राचे भवितव्य काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. ही सुनावणी पुढे कधी होणार, याबाबतही माहिती देण्यात आलेली नाही.