रझाकारांशी कुठलीच तडजोड नाही!
ढाका विद्यापीठात पाकिस्तान विरोधात आक्रोश
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशसोबत मिळून भारताच्या विरोधात कट रचणाऱ्या पाकिस्तानला तेथील युवा आणि विद्यार्थ्यांनी आरसा दाखविला आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथील विद्यार्थ्यांनी विजय दिनापूर्वी मोठी निदर्शने करत रझाकारासोबत कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. या विद्यार्थ्यांनी पाकिस्तानला थेट आव्हान दिले आहे. विद्यार्थ्यांनी विजय दिनानिमित्त विद्यापीठ प्रवशद्वारावर मोठा बॅनर लावला असून यात त्यांनी 1971 च्या युद्धात पराभूत पाकिस्तानचा ध्वज दाखवून ‘नो क्रॉम्प्रमाइज विथ रझाकार’ असा स्पष्ट संदेश दिला आहे.
विद्यार्थ्यांनी 1971 मध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या नरसंहाराचा मुद्दा उपस्थित केला. एक स्वतंत्र राष्ट्राच्या स्वरुपात जन्माला येण्यासाठी बांगलादेशच्या लोकांनी मोठी किंमत मोजली आहे. पिढ्या बदलू शकतात, परंतु सत्य बदलत नाही असे या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
1971 मध्ये 30 लाख हुतात्मा आणि 2 लाख महिलांच्या अस्मितावर आघात झाला. या मोठ्या किमतीवर मिळालेल्या स्वातंत्र्याबाबतीत कुठलीच तडजोड होणार नाही असे ढाका विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. बांगलादेश दरवर्षी 16 डिसेंबर रोजी स्वत:चा विजय दिन साजरा करतो. याच दिवशी 1971 साली पाकिस्तानी सैन्याने ढाका येथे भारतीय सैन्य आणि मुक्तिवाहिनीसमोर आत्मसमर्पण केले होते. बांगलादेशात विजय दिनाची सध्या तयारी सुरू झाली आहे