महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जपानमध्ये उमेदवारांचीच वानवा

06:36 AM Apr 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्थानिक निवडणुकांमधील अजब प्रकार

Advertisement

भारतात निवडणूक आयोग लोकांनी अधिकाधिक संख्येत मतदान करावे असे आवाहन करत असतो. परंतु जपामध्ये अनोखी समस्या उद्भवली आहे. तेथील जिल्हय़ांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये 40 टक्के भागांमध्ये निवडणूक लढविण्यासाठी एकही उमेदवार न मिळाल्याने निवडणूकच होऊ शकलेली नाही. यामुळे जपानच्या सरकारला लोकांना निवडणुकीत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे लागत आहे. परंतु कमी होत चाललेली लोकसंख्या अन् वृद्धांचे वाढते प्रमाण यामुळे सरकारच्या प्रयत्नांना यश मिळालेले नाही. लोकशाहीत अशाप्रकारच्या समस्येचे हे अत्यंत अजब उदाहरण दिसून येत आहे.

Advertisement

या निवडणुकांमध्ये मतदारांना 9 भागांमध्ये गव्हर्नर, 6 मोठय़ा शहरांमध्ये महापौर आणि 17 शहरांमध्ये विधानसभा सदस्यांची निवड करण्यात येणार होती. लोकांना प्रोत्साहित होत स्थानिक निवडणुकांमध्ये उमेदवार म्हणून सहभागी व्हावे याकरता जपानच्या सरकारने प्रयत्न केले होते, परंतु या प्रयत्नांना यश मिळू शकलेले नाही.

दोन प्रमुख कारणे

उमेदवारच न मिळण्यामागे जपानची कमी होत चाललेली लोकसंख्या आणि वृद्ध होत चाललेला समाज कारणीभूत आहे. 375 शहरे आणि गावांसाठीच्या विधानसभा सदस्यांच्या निवडीसाठी 2019 मध्येही प्रयत्न करण्यात आला होता, तेव्हा देखील 93 मतदारसंघांमध्ये एकही उमेदवार उभा राहिला नव्हता. निवडणूकच न झाल्याने रिक्त जागांचे प्रमाण 23.3 टक्क्यांपर्यंत पोहोचले हेते.

लोकसंख्येची समस्या

जपान सध्या लोकसंख्येशी संबंधित अनेक गंभीर समस्यांना सामोरा जात आहे. योग्य पावले उचलण्यात न आल्यास तेथील स्थिती बिकट होत जणार आहे. एक दिवस हा देशच गायब होईल अशाप्रकारचा इशारा जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि त्यांच्या वरिष्ठ सल्लागाराने अलिकडेच दिला आहे. किशिदा यांनी देशाच्या लोकसंख्येच्या चिंताजनक समस्येवर लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

कमी प्रजनन दर

जपानमधील प्रजनन दर हा जगात सर्वात कमी आहे. हा प्रजनन दर 1.3 इतका आहे. आवश्यक 2.1 च्या तुलनेत हा दर खूपच मी आहे. तर दुसरीकडे 2014 च्या आकडेवारीनुसार जपानच्या लोकसंख्येचा 38 टक्के हिस्सा 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांचा आहे. 25.9 टक्के लोक 65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे हेते.

तरुण-तरुणींमध्ये कमी होत चाललेले स्वारस्य

जपानमधील तरुण-तरुणींमध्ये राजकारणाशी संबंधित स्वारस्य सातत्याने कमी होत आहे. तेथील तरुण-तरुणींना निवडणूक लढविण्यात रस नाही. स्थानिक राजकारण सर्वसामान्य लोकांना फारसे आकृष्ट करत नसल्याने उमेदवारच न मिळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच तेथे शहरांमध्ये अधिक संख्येत लोक राहत असल्याने ग्रामीण लोकसंख्येतील घट चिंता वाढत आहे. जपानचे सरकार लोकांना शहरांबाहेर वसविण्यासाठी प्रेरित करत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article