प्रत्यार्पण टाळण्यासाठी तहव्वूर राणाची धडपड
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात धाव : मुंबईतील 26/11 हल्ल्याशी लागेबांधे, आर्थिक रसद पुरविल्याचा ठपका
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याने भारताकडे होणाऱ्या प्रत्यार्पणाविरोधात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. यावषी 15 ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या फेडरल न्यायालयाने भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार तहव्वूरला भारतात पाठवण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात तहव्वूर राणाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्यावर मुंबई हल्ल्यासाठी आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे.
तहव्वूर राणा या पाकिस्तानी वंशाच्या पॅनेडियन व्यावसायिकाने गेल्यावषी फेडरल कोर्ट नाइनथ सर्किटमध्ये याचिका दाखल केली होती. सुनावणी होईपर्यंत आपल्याला भारताच्या ताब्यात देऊ नये, अशी विनंती त्याने न्यायालयाला केली होती. त्याची ही मागणी न्यायालयाकडून फेटाळण्यात आली होती. मे 2023 मध्येही अमेरिकन न्यायालयाने राणाची याचिका फेटाळली होती. साहजिकच आता सर्वोच्च न्यायालयानेही तहव्वूरचे अपील फेटाळले तर त्याला पुढे अपील करता येणार नाही. त्यानंतर तहव्वूरला भारतात आणण्याची प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होणार आहे. राणावरील गुन्हे अमेरिका आणि भारत यांच्यातील प्रत्यार्पण कराराच्या अटींनुसार ग्राह्या असल्याचा दावा समितीने केला आहे. या हल्ल्याबाबत राणा यंच्यावरील आरोपांचे भक्कम पुरावे भारताने दिल्याचे पॅनेलने मान्य केले. आता राणाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे.
गेल्यावषीही याचिका फेटाळली
भारताच्या ताब्यात जाऊ नये म्हणून पाकिस्तानी वंशाच्या तहव्वूर राणाने अमेरिकन न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. जेव्हा एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीर कोठडीत ठेवले जाते तेव्हा हेबियस कॉर्पस याचिका वापरली जाते. यानंतर, लॉस एंजेलिसच्या जिल्हा न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते की, भारताने तहव्वूरच्या प्रत्यार्पणाची मागणी ज्या आरोपांच्या आधारे केली आहे, त्याचा विचार करून त्याच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली जाऊ शकते. आपल्या विरोधात निकाल दिल्यानंतर राणाने नवव्या सर्किट न्यायालयात दुसरी याचिका दाखल केली होती. याबाबतचा निर्णय ऑगस्टमध्ये आला होता. त्यात हेबियस कॉर्पस याचिका फेटाळणे योग्य ठरवण्यात आले.
हेडली-राणाकडून कट-कारस्थान
मुंबई हल्ल्यातील आरोपी हेडलीला मदत करून आणि त्याला आर्थिक रसद पुरवून तहव्वूर राणा दहशतवादी संघटना आणि हेडलीसह अन्य दहशतवाद्यांना पाठिंबा देत होता. हेडली कोणाला भेटत होता, काय बोलतोय याची माहिती राणाकडे होती. त्याला हल्ल्याचे नियोजन आणि काही लक्ष्यांची नावेही माहीत होती. राणा हा या संपूर्ण कटाचा एक भाग होता आणि त्याने दहशतवादी हल्ल्याला आर्थिक मदत केल्याचा गुन्हा केला असण्याची शक्मयता आहे, असे अमेरिकन सरकारने म्हटले आहे.