महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात हेण्याची शक्यता

07:00 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नववर्षात मोदी सरकारकडून निर्णयाची चर्चा

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा विचार करत आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून योजना आखली जात आहे. सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 8 ते 10 ऊपयांपर्यंत कपात करण्याची घोषणा करू शकते. नववर्षात या निर्णयाची घोषणा केली जाऊ शकते अशी बातमी समोर येत आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने पंतप्रधानांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव तयार केला असून इंधन दरात प्रतिलिटर 8 ते 10 ऊपयांची कपात करण्यात आली आहे. या प्रस्तावाला मंजुरी  मिळाल्यास सरकार त्याची घोषणा करू शकते. 6 एप्रिल 2022 पासून म्हणजे गेल्या दीड-पावणेदोन वर्षात सरकारी तेल कंपन्यांकडून इंधनाच्या रिफायनरीपूर्व किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. चालू आर्थिक वर्षात, कच्च्या तेलाच्या कमी किमतीमुळे इंडियन ऑईल कॉर्प (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्प लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्प लिमिटेड (एचपीसीएल) या तीन सरकारी तेल कंपन्यांना प्रचंड नफा झाला आहे. यासह, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत तेल कंपन्यांनी संयुक्तपणे 58,198 कोटी ऊपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीमुळे इंधनदरात कपात करून सरकार वाहनधारकांना दिलासा देऊ शकते. प्रत्येक राज्यात स्थानिक करांनुसार इंधनाचे दर वेगवेगळे आहेत. सध्या दिल्लीत पेट्रोल 96.65 ऊपये आणि डिझेल 89.82 ऊपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. मुंबईत हा दर पेट्रोल 106.31 ऊपये तर डिझेल 94.27 ऊपये प्रतिलिटर इतका आहे. या दरांमध्ये आठ ते दहा रुपये कपात झाल्यास देशवासियांना मोठा दिलासा मिळू शकतो.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article