कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विमान आहे, प्रवासी नाहीत

06:40 AM Oct 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतात एक अद्भूत विमानतळ आहे. या विमानतळावर विमान आहे. तथापि, एकही प्रवाशाने या विमानतळावरुन उड्डाण केलेले नाही. तसेच कोणताही प्रवासी त्यावर उतरलेलाही नाही. तरीही, हा विमानतळ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांना आवडतो. हा विमानतळ हैद्राबादच्या रामोजीराव फिल्म सिटीत आहे. व्यवहारत: हा खरा विमानतळ नाही. तथापि, सेटींगच्या माध्यमातून तो अशा प्रकारे उभारण्यात आला आहे, की तेथे गेल्यास तो खराच विमानतळ असल्याचा भास होतो. तो विशेषत्वाने चित्रपटांच्या शूटींगसाठी बनविण्यात आलेला विमाततळ आहे.

Advertisement

या विमानतळावर आतापर्यंत शेकडो हिंदी आणि अन्य भाषांमधील चित्रपटांचे शूटिंग करण्यात आले आहे. खऱ्या विमानतळावर शूटिंग करणे कित्येकदा शक्य होत नाही कारण असे विमानतळ शूटिंगसाठी उपलब्ध होणे जवळपास अशक्य असते. खऱ्या विमानतळांवर सातत्याने विमानांचे ये जा होत असते. त्यामुळे शूटिंगसाठी तो मिळू शकत नाही. तसेच सुरक्षेच्या कारणास्तवही हे शक्य नसते. त्यामुळे ज्या चित्रपटांमध्ये विमान चढण्या-उतरण्याचे दृष्य असते, त्यांच्यासाठी खरा भासणारा, पण प्रत्यक्षात खरा नाही, असा विमानतळ उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता होती. त्यामुळे रामोजीवर फिल्म सिटीत अशा प्रकारचा विमानतळ उभा करण्यात आला आहे. तो इतका खऱ्यासारखा आहे, की ते केवळ सेटींग आहे, यावर तो पाहिलेल्यांचा विश्वास बसत नाही. येथे एक विमानही थांबविण्यात आले आहे. त्यामुळे विमानांसंबंधी शूटिंग करण्याची मोठी सोय झाली आहे. तसेच, हा विमानतळ शूटिंगसाठी 24 तास उपलब्ध असतो. खरा विमानतळ शूटिंगसाठी उपलब्ध झालाच, तर त्याचे भाडेही प्रचंड असते. हा विमानतळ त्या तुलनेत स्वस्तात उपलब्ध असल्याने चित्रपट निर्मात्यांची येथे रीघ लागलेली असते. या विमातळावर जेव्हा शूटीग केले जाते, तेव्हा चित्रपट निर्मात्यांनी एकच काम करायचे असते. ते म्हणजे या विमानळाचे नाव बदलणे. चित्रपटाच्या आवश्यकतेनुसार विमानळाचे नाव बदलले की त्यांचे काम होते. इतर सेटिंगमध्येही काही प्रमाणात परिवर्तन करता येते. त्यामुळे प्रत्येक चित्रपटात हा विमानतळ वेगळा भासतो. त्यामुळे हे शूटिंग एकाच विमानतळावर झाले आहे, हे चित्रपट दर्शकांच्या लक्षातही येत नाही. त्यामुळे तो निर्मात्यांचा आवडता तळ आहे.

Advertisement

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article