Solapur News : सोलापूर मनपा प्रशासनात 'खांदेपालट' झाले, कारभार कधी पालटणार ?
सोलापूर महापालिकेत प्रशासनात खांदेपालट
सोलापूर : सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी प्रशासनात खदिपालट केली असून उपायुक्त आशिष लोकरे यांच्याकडे तब्बल १३ विभागांची जबाबदारी सोपवली आहे. अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्याकडे आठ विभाग सोपवले असून दुसरे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजें यर्याच्याकडे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच विभाग देण्यात आले आहेत.
आयुक्तांनी प्रशासकीय कामात सुसूत्रता यावी यासाठी ही खांदेपालट केली आहे. सोलापूर महापालिकेचा कारभार मोठा असून शहराची वाढती नागरी बस्ती पाहता नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. प्रशासनात 'खदिपाल' झाले तरी प्रत्यक्ष 'कारभार पालट' झाल्याशिवाय सोलापूरकरांना बदल जाणवणार नाही.
सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने 'आपली तक्रार पोर्टल' व 'माय सोलापूर अॅप' ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावर शहरातील नागरिकांकडून आलेल्या तक्रारींवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता त्या तक्रारी प्रलंबितच ठेवल्याने महापालिकेच्यासंबंधित विभागातील १३ कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यासंदर्भातील आदेश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत. महापालिकेने या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांकडून नोंदविलेल्या तक्रारींचे संबंधित विभागात मुदतीत उगारावा लागत आहे.
निवारण करून त्याची माहिती पोर्टलवर अद्ययावत करण्याचे निर्देश सर्व विभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार देण्यात आलेले आहेत. सोलापूर महापालिकेच्या 'आपली तक्रार पोर्टल व 'माय सोलापूर' अॅपवर नागरिकांकडून प्राप्त तक्रारी निर्धारित वेळेत निकाली न काढल्याबद्दल विविध विभागातील कर्मचाऱ्यावर प्रशासकीय दंड आकारण्यात आला. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासनात खांदेपालट झाला असला तरी कामचुकार कर्मचार्यांची मानसीकता कायम असल्याने कारभारात 'पालट' कधी होणार? असा प्रश्न सोलापूरकर विचारत आहेत.