महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बिडी-बेकवाड रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे

10:21 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नंदगड : खानापूर-तालगुप्पा राज्य मार्गावरील बिडीपासून बेकवाड, झुंजवाडपर्यंतच्या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय होत आहे. बिडी हे तालुक्यातील महत्त्वाचे गाव आहे. परिसरातील 50 गावांचा संपर्क या गावांशी येतो. शिवाय येथे महसूल केंद्र आहे. शाळा, दवाखाना व अन्य कामांसाठी येथे जनतेचा रोजचा संपर्क असतो. त्यामुळे बिडीला जाण्यासाठी हा रस्ता कुचकामी ठरला आहे. खानापूरहून कारवार, दांडेली, हल्याळ, यल्लापूर, शिरशी धारवाड, हुबळीला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. खानापूरपासून झुंजवाडपर्यंत काही ठिकाणी रस्ता बऱ्यापैकी करण्यात आला आहे. तर झुंजवाडपासून बिडीपर्यंतचा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा चरी पडल्या आहेत. या खड्यांमुळे लहान मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article