कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मंगोलियात माणसांपेक्षा अश्वांचे प्रमाण अधिक

06:44 AM Mar 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एका देशात माणसांपेक्षा अश्वांचे प्रमाण अधिक आहे. हा देश आशियातील असून याचे नाव मंगोलिया आहे. याचबरोबर मंगोलिया या देशात अश्वसंस्कृती अन् त्याचा इतिहास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मंगोलियाची लोकसंख्या सुमारे 34 लाख आहे, परंतु येथील अश्वांची संख्या 40 लाखाहून अधिक आहे. या देशात प्रत्येक व्यक्तीकडे कमीतकमी एक अश्व असणे आवश्यक आहे. मंगोलियात प्राचीन काळात भटके लोक स्वत:चे पूर्ण जीवन अश्वांवरून हिंडण्यात व्यतित करत होते. मंगोलियन लोकांनुसार तेथे अश्वांशिवाय जीवन अपूर्ण आहे.

Advertisement

Advertisement

मंगोलियात दरवर्षी ‘नादाम फेस्टिव्हल’ साजरा करण्यात येतो. हा फेस्टिव्हल तीन मोठे खेळ घौडदौड, कुस्ती आणि तिरंदाजीसाठी ओळखला जातो. या सणात घौडदौडीत 5 ते 12 वर्षांपर्यतची मुले अश्वारोहण करत असतात. घौडदौड केवळ शक्तीचा खेळ नसून धैर्य अन् रणनीतिचा देखील खेळ असल्याचे मंगोलियाच्या लोकांचे मानणे आहे. याचमुळे येथे अश्वांना कमी वयापासूनच प्रशिक्षण दिले जात असते. मंगोलियातील अश्व हे उर्वरित जगाच्या अश्वांपेक्षा अत्यंत वेगळे असतात. प्रत्यक्षात हे कमी उंचीचे परंतु अत्यंत मजबूत असतात. तसेच सहनशील अन् समजूतदार असतात. मंगोलियन लोकांनुसार जर एखादा अश्व कुठल्याही ठिकाणी गेला तर तो न पाहताही तेथील मार्ग ओळखू शकतो.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article