बर्फाखाली आहेत 400 सरोवरं
लाखो वर्षांपासू गोठलेल्या अवस्थेत बर्फ
अलिकडेच वैज्ञानिकांनी एक चकित करणारा शोध लावला आहे. वैज्ञानिकांनी अंटार्क्टिकामध्ये लाखो वर्षांपासून गोठलेल्या बर्फाखाली 400 हून अधिक सरोवरांचा शोध लावला आहे. हा शोध केवळ ध्रूवीय क्षेत्रांविषयीचे ज्ञान वाढविणारा नसून हवामान बदल आणि पृथ्वीच्या इतिहासाविषयी अनेक आवश्यक प्रश्नांची उत्तरेही देऊ शकतो. तसेच यामुळे अनेक रहस्यं समोर येणार आहेत.
वैज्ञानिकांनी या शोधासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर केला आहे. त्यांनी रडार इमेजिंग आणि अन्य उपकरणांच्या मदतीने बर्फाच्या अनेक थरांना भेदून त्याखाली लपलेल्या पाण्याच्या विशाल भांडारांचा शोध लावला. या सरोवरांचा आकार आणि खोली वेगवेगळी आहे. काही सरोवरं अनेक किलोमीटर लांब आणि शेकडो मीटर खोल आहेत.
सरोवरं हवामान बदलाच्या प्रभावांना समजण्यासाठी आवश्यक माहिती पुरवू शकतात. या सरोवरांमध्ये लाखो वर्षांपासून पृथ्वीच्या हवामानाचा रिकॉर्ड सुरक्षित असल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे. या सरोवरांच्या पाण्याचे अध्ययन करून वैज्ञानिक भूतकाळात पृथ्वीचे तापमान कसे बदलत राहिले आहे आणि भविष्यात हवामान बदलाचे परिणाम काय असू शकतात हे जाणून घेऊ शकतात.
याचबरोबर या सरोवरांमध्ये काही अज्ञात जीव आढळतील अशी वैज्ञानिकांना अपेक्षा आहे. हे जीव अत्याधिक थंडी आणि काळोख्या वातावरणात राहण्याच्या दृष्टीने अनुकूल झाले असतील. या जीवांचे अध्ययन करत वैज्ञानिक जीवनाची उत्पत्ती आणि विकासाविषयी नवी माहिती प्राप्त करू शकतात.
याचबरोबर ही सरोवरं पृथ्वीच्या भूगर्भीय इतिहासाविषयी आवश्यक माहिती प्रदान करू शकतात. या सरोवरांच्या पाण्यात खनिज आणि अन्य पदार्थ मिसळलेले आहेत. हे पदार्थ पृथ्वीच्या आत होणाऱ्या भूगर्भीय प्रक्रियांविषयी माहिती पुरवू शकतात असे वैज्ञानिकांचे मानणे आहे.