कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

..तर नेतान्याहूंना करणार अटक!

06:10 AM Sep 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांची घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

Advertisement

न्यूयॉर्क शहराचे महापौरपदाचे उमेदवार जोहरान ममदानी यांनी निवडणुकीत विजयी झाल्यास इस्रायलच्या पंतप्रधानांना अटक केली जाईल अशी घोषणा केली आहे. निवडणुकीत विजयी झाल्यावर त्वरित न्यूयॉर्क पोलीस विभागाला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू शहरात दाखल झाल्यास त्यांना त्वरित अटक करण्याचा आदेश देणार असल्याचा दावा ममदानी यांनी केला. न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदासाठी 4 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. ममदानी हे डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार असून ते भारतीय मतदारांना स्वत:च्या बाजूने वळविण्यासाठी हिंदी आणि उर्दूतूनही प्रचार करत आहेत.

बेंजामीन नेतान्याहू हे गाझामध्ये नरसंहार करत असून आंतरराष्ट्रीय न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. हे वॉटर मी महापौर झाल्यावर लागू करणार आहे. न्यूयॉर्क शहराने आंतरराष्ट्रीय कायद्यासोबत उभे राहण्याची गरज असल्याचे वक्तव्य ममदानी यांनी केले. न्यूयॉर्कमध्ये शहराचा पोलीस आयुक्त हा महापौराच्या अधीन असतो. परंतु नेतान्याहू यांना अटक करविणे ममदानी यांच्यासाठी व्यवहारिक स्वरुपात शक्य नसेल, कारण अमेरिका आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अधिकाराला मान्यता देत नाही तसेच तो या संस्थेचा सदस्य देखील नाही. याचमुळे न्यूयॉर्कचा महापौर या निर्णयाला लागू करण्यास बांधीलल नाही. तर फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या विरोधात निर्बंध लादण्याचा आदेश दिला होता.

न्यूयॉर्कमधील बहुतांश रहिवासी पॅलेस्टिनी आंदोलनाचे समर्थन करत असल्याचे सर्वेक्षणात आढळुन आले, परंतु ममदानी यांच्या टिप्पणीमुळे शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्क हे इस्रायलमधील तेल अवीवनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे ज्यूंचे वास्तव्य असलेले शहर आहे. जोहरान ममदानी हे भारतीय चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांचे पुत्र आहेत. तर जोहरान यांचे वडिल महमूद ममदानी  आहेत. जोहरान यांचा युगांडाच्या कंपाला येथे झाला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article