महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केदनूर येथे भरदुपारी दोन घरे फोडली

10:57 AM Oct 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

साडेतीन लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लांबविला

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यात चोऱ्या, घरफोड्या सुरूच आहेत. केदनूर (ता. बेळगाव) येथील दोन घरे फोडून सुमारे साडेतीन लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज पळविण्यात आला आहे. शनिवारी भरदुपारी घडलेल्या चोरीच्या या घटनांनी परिसरात खळबळ माजली आहे. नवरात्रीचे दिवस असल्यामुळे लोक आपल्या घरांना कुलूप लावून देवदर्शनाला जात आहेत. हीच संधी साधून गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. शनिवार दि. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 यावेळेत केदनूर येथील दोन घरे फोडण्यात आली असून काकती पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

जोतिबा मोनाप्पा पाटील यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून सव्वातीन तोळे सोन्याचे दागिने व 60 हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी पळविली आहे. याच गावातील होळ्याप्पा वर्गे यांचे घर फोडून एक तोळा सोने व 10 हजार रुपये रोख रक्कम पळविल्याची प्राथमिक माहिती आहे. काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे पुढील तपास करीत आहेत. भरदिवसा घडलेल्या चोरीच्या या घटनांनी नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article