महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ट्रायलच्या नावाखाली दुचाकींची चोरी

06:48 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हावेरीतील चोरट्याचा बेळगावातही वावर

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

ट्रायल बघण्याचे सांगून दुचाकी पळविणाऱ्या एका युवकाचा उपद्रव वाढला आहे. हावेरी जिल्ह्यातील या युवकाच्या शोधासाठी माळमारुती पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. केवळ बेळगावच नव्हे तर कारवार, आंध्रप्रदेशसह विविध ठिकाणी त्याने मोटारसायकली पळविल्या आहेत.

अराफत अब्दुलअजीमसाब अत्तार (वय 29) रा. रेहमानसाब एरिया, मेडलेरी, ता. राणेबेन्नूर, जि. हावेरी या गुन्हेगाराचा बेळगाव परिसरातही वावर वाढला आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचा शोध घेण्याचे काम हाती घेतले असून या गुन्हेगाराविषयी माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

एखाद्या ठिकाणी चोरलेली दुचाकी घेऊन दुसऱ्या शहरातील गॅरेजमध्ये तो जातो. आपली दुचाकी दुरुस्तीला देऊन तेथेच थांबतो. दुरुस्तीसाठी आलेल्या इतर वाहनांच्या मालकांना भेटून ‘मलाही तुमच्यासारखीच दुचाकी घ्यायची आहे’ असे सांगत ट्रायल बघण्याचे सांगून तेथील दुचाकी पळवतो. आपण आणलेली चोरीची दुचाकी गॅरेजमध्येच सोडून तो पलायन करतो.

बेळगाव परिसरातही अराफतच्या कारवाया दिसून आल्या आहेत. चार दिवसांपूर्वी बसवन कुडचीजवळील एका गॅरेजमध्ये आपण आणलेली बुलेट दुरुस्तीसाठी सोडून दुसऱ्याची दुचाकी त्याने पळविली आहे. चार दिवसांनंतरही अराफत गॅरेजला परतला नाही म्हणून संबंधितांनी पोलिसांना माहिती दिली आहे. माळमारुती पोलिसांनी बुलेट कोणाची आहे? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आंध्रप्रदेशमधून तिची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे.

गेल्यावर्षी कारवार जिल्ह्यातील यल्लापूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात त्याला रंगेहाथ पकडण्यात आले होते. हुबळी येथील गोकुळ रोड पोलीस स्थानकात सेवा बजावत असताना स्वत: पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी अराफतला अटक केली होती. आता बेळगाव परिसरातच त्याने कारवाया सुरू केल्या आहेत. खासकरून गॅरेजचालकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ट्रायल बघण्याच्या नावाखाली दुचाकी पळविणाऱ्या अराफतविषयी कोणाला माहिती मिळाल्यास 9480804107 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article